Breaking news

युवा सेनेच्यावतीने सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)अनेक सामान्य शेतकर्‍यांना आपल्या मुलीच्या विवाहाची जी चिंता सतावत असते , त्यामागे विवाहावर होणार खर्च, हेच एक मुख्य कारण असते. त्यामुळे अशा शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया दिलासा देण्यासाठी व सामाजिक बांधीलकी जोपासीत युवासेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी 17 एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या मुलींसाठी सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन केले आहे.

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचे सामाजिक उपक्रमात नेहमीच एक पाऊल पुढे राहिले आहे. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या धोरणाचा पावडे यांनी सातत्याने अंगीकार केला आहे. त्यामुळेच आजवर त्यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये सामुहिक विवाह सोहळा हा उपक्रम निश्चितच वेगळेपण जपणारा आहे. आर्थिक विवंचेनेत सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी माधव पावडे यांनी 17 एप्रिल रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय कॅनॉल रोड वाडी (बु) येथे सकाळी 11.30 वाजता सामुहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. या विवाह सोहळयात वधूचे मनी मंगळसूत्र व वधु वरांचे कपडयासह सर्व खर्च हा युवा सेनेच्या वतिने करण्यात येणार आहे. हा विवाह सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवासेनेच्या वतिने विविध कमिटया स्थापन करण्यात येणार असून विवाह सोहळा यशस्वीतेसाठी युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, बळवंत तेलंग, तालुकाप्रमुख गजानन कदम, शहरप्रमुख नवज्योतसिंग गाडीवाले, संतोष पावडे, सरपंच नारायण कदम, कामगार सेना तालुका प्रमुख शिवाजी पावडे, गजानन सावंत, नितीन सरोदे, प्रल्हाद पावडे, गणेश शिंदे, सतिष पांगरीकर, क्षितीज जाधव, धनंजय पावडे, गजानन भोसले, अशोक पावडे, अभिजीत भालके, कृष्णा बजाज, सौरभ शेळके, धिरज ठाकूर, महेश जाकापूरे, विठ्ठल पिंपळगावकर, चंद्रकांत कदम, राम देशमुख, समीर देशमुख, गोविंद किरकन, गोविंद जोगदंड, शैलेश मुळे, केशव रासे, पुरभाजी जाधव, बंडू पुयणीकर, दिप चिखलीकर, माधव भोजने, नकुल जैन, यासह युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेत आहेत. या सामुहिक विवाह मेळाव्यात आपल्या कन्येचा विवाह आयोजित करण्यासठी पालकांनी वामननगर येथील युवा सेनेच्या संपर्क कार्यालयात नाव नोंदणी केरावी असे आवाहन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी केले आहे.

Related Photos