नांदेड–वसमत-पूर्णा–पालम–लोहा या तालुक्यांना जोडणारा ८० कोटींचा पूल मंजूर

नांदेड(प्रतिनिधी)नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर ला जोडणारा तसेच नांदेड पूर्णा व नांदेड लातूर या दोन अंतरराष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मोहनपुरा(बेटसांगवी) येथे ८० कोटींचा पूल आमदार हेमंत पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर झाला.

मागील अनेक वर्षापासून नांदेड-वसमत-पूर्णा-लोहा-पालम या पाचही तालुक्यांना जोडणारया पुलाची मागणी सर्वसामान्य जनमाणसातून करण्यात येत होती. विष्णूपुरी ते पेन्नुर या ५० कि.मी. च्या अंतरावर स्वतंत्र मिळाल्यापासून एकही पूल नसल्यामुळे येथील जनतेला या पाच तालुक्याना दळणवळण संपर्क साधण्यासाठी हाल अपेष्टा सहन कराव्या लागत होत्या. याची दखल घेत नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी या कामासाठी पुढाकार घेतला. हा पूल विष्णूपुरीच्या जलसाठा (बॅक वाटरमध्ये) असल्यामुळे याचे परीक्षण करताना यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या होत्या. या अडचणीवर मात करून आमदार हेमंत पाटील यांनी या कामात सातत्यपूर्ण लक्ष घालून या कामाची नियोजन पूर्वक परीक्षण पूर्ण करून घेतले. व या वर्षीच्या २०१७-१८ च्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात या पुलासाठी ८० कोटी रुपयाची तरतूद मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मा. चंद्रकांतदादा पाटील(मंत्री-सार्वजनिक बांधकाम), मा. एकनाथजी शिंदे(मंत्री-सार्वजनिक बांधकाम), अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्याकडून मंजूर करून घेतली.

हा पूल जैतापूर-निळा-पूर्णा ते मोहनपुरा-भनगी-दगडगाव- सोनखेड ला जोडणारा असून यामुळे नांदेड ते पूर्णा व नांदेड ते लातूर या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडला जाणार आहे, त्यामुळे नांदेड दक्षिण तसेच नांदेड उत्तर मधील व नांदेड जिल्ह्यातील उन्नतीच्या दृष्टीने पडलेले पाउल असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. हा पूल नांदेड-पूर्णा–पालम–लोहा या चार तालुक्याच्या रहदारीसाठी अत्यंत सोयीचा झाला असून यामुळे वेळेची बचत व पैशाची बचत होईल असे सर्व सामान्यामधून बोलले जात आहे तसेच आनंदहि व्यक्त केला जात आहे.

Related Photos