Breaking news

वरिष्ठ लिपीक खंडेरायसह दोन कर्मचाऱ्यांना खंडणी प्रकरणात दोन दिवसांची पोलिस कोठडी

नांदेड(खास प्रतिनिधी)जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाचा वाद हा गेल्या अनेक दिवसांपासून धुसपूसत होता. अखेर हा वाद खंडणीच्या रूपाने तीन कर्मचाऱ्यांचा बळी घेतला. यात वरिष्ठ लिपीक खंडेरायसह अन्य दोन कर्मचाऱ्यांनी खंडणी मागितल्याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपींना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असते दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली.

यातील सविस्तर माहिती अशी की, नांदेड शहरात असणाऱ्या जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील जिल्हा कार्यालयीन अधीक्षक बालाजी बोड्डावार यांनी चार महिन्यांपूर्वी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक भरत खंडेराय यांच्याकडे अधीक्षक पदाचा पदभार दिला होता. याच काळात एका सुजाण नागरिकाने प्रमाणपत्र अभ्यासक्रमाबद्दलची माहिती माहितीच्या अधिकार कायद्यानुसार जनमाहिती अधिकारी बालाजी बोड्डावार यांच्याकडे वार्षिक तपासणी अहवाल संचिकापत्र जावक क्रमांक 145 दि. 28 फेबु्रवारी 2017 अन्वये माहिती मागितली होती. याबाबत नियमाप्रमाणे पदभार बोड्डावार यांच्याकडे देताना दि. 28 फेबु्रवारी रोजी माहिती अधिकारी बोड्डावार यांच्याकडे पत्र देण्यासाठी गेलो असता बोड्डावार यांनी पत्र घेण्यास टाळाटाळ केली. बोड्डावार यांनी हे पत्र मी उद्या घेतो असे सांगून निघून गेले. यावेळी खंडेराय यांनी ते पत्र घेवून प्रभारी अधिकारी बुजाडे यांची स्वाक्षरी घेतली. याचबरोबर दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी पत्र देण्यासाठी बोड्डावार यांच्याकडे गेलो असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ व अश्लील भाषेचा वापर करीत मारहाण करून कार्यालयाच्या बाहेर फरफटत नेले. याबाबत मी रितसर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी अर्ज केला. याचबरोबर व्यवसाय शिक्षण-प्रशिक्षण संचालक कार्यालय मुंबई व सहसंचालक कार्यालय औरंगाबाद यांनाही निवेदनाच्या प्रत पाठविल्या. याबाबत औरंगाबाद सहसंचालक कार्यालयाकडून दि.14 रोज मंगळवारी दोन सदस्यी चौकशी समिती पाठविण्यात आली. यामध्ये एन.ए.निकम, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी बीड आणि प्राचार्य एस.एम. पाटील, उच्चस्तर आ.प्रो.संस्था औरंगाबाद यांचा या चौकशी समितीत समावेश आहे. सहसंचालक कार्यालय औरंगाबाद यांनी झालेल्या प्रकाराबाबत सखोल चौकशी करण्यासाठी पाठविला आहे. या समितीची चौकशी चालू असतानाच समितीसमोर पुन्हा खंडेराय आणि बोड्डावार यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचेही कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे चौकशी समितीसमोरच वाद झाल्याने यामध्ये दोन्ही कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई केली जाईल हे मात्र चौकशीचा अहवाल सादर केल्यानंतर समजेल, असे सांगण्यात येत होते. पण चौकशी अहवाल येण्याच्या अगोदरच वरिष्ठ लिपीक खंडेराय याचबरोबर बिलोली कार्यालयातील कनिष्ठ लिपीक गोपाल गणपतराव इंगळे, तथा तासिका तत्वावर असणारे शिक्षक अशोक सटवाजी गायकवाड या तिघांनी कार्यालयीन अधीक्षक बालाजी धर्माजी बोड्डावार यांच्याकडून पाच ते दहा हजार रूपयांची खंडणी मागितली होती. ही खंडणी झालेला प्रकार मिटविण्यासाठी याबाबत बोड्डावार यांनी रितसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सापळा रचला होता. यातील आरोपी खंडेराय, इंगळे व गायकवाड या तिघांनी अनुराधा पॅलेसच्या समोर हिंगोली गेट येथे खंडणी मागितल्या प्रकरणी वजिराबाद पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला. शनिवारी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायाधीश एस.एन. सचदेव यांच्यासमोर हजर केले असताना यांनी यातील तिन्ही आरोपींना दोन दिवस म्हणजेच 20 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Photos