Breaking news

घातक हत्यार बाळगणारा युवक ग्रामीण पोलिसांच्या अटकेत

नांदेड(खास प्रतिनिधी)वाजेगाव परिसरात घातक हत्यार घेऊन फिरणाऱ्या एका युवकाला नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडून त्याच्याविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नांदेडच्या वाजेगाव परिसरात नांदेड ग्रामीणचे पोलिस पथक फिरत असताना त्यांंनी जयसिंघ रणधीर राणे (30) या युवकास थांबवून त्याची तपासणी केली. त्याच्याकडे घातक असे मोठ्या आकाराचे खंजीर हे हत्यार होते. या जयसिंघ मुळेच वाल्मीकीनगर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या राड्यात जवळपास 20 जणांवर भादवीचा कलम 307 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील बरेच लोक अद्याप तुरूंगात आहेत. या जयसिंघने वाल्मीकीनगर मधील एक युवती पळून नेऊन तिच्यासोबत विवाह केल्याने वाल्मीकीनगरमध्ये राडा झाला होता.

आज दि. 18 रोज दुपारी 4 च्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक कल्याण नेहरकर त्यांचे पथक फिरत असताना हा घातक हत्यार घेऊन पोलिसांना सापडला. त्याच्याविरूद्ध कल्याण नेहरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 4 (25) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुनील निखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महेमुद हे करीत आहेत.

Related Photos