Breaking news

दहाचे नाणे घेण्यास दुकानदाराची मनाई... बँकेचे तोंडावर बोट हाताची घडी

नांदेड(प्रतिनिधि)हिमायतनगर तालुक्यातील छोटे मोठे व्यवसाईक दुकानदारानी शासनाचे नाणे बंदीचे कोणतेही आदेश नसताना ग्राहकांना दहाचे नाणे चलनातून बाद झाले म्हणूनघेण्यास मनाई करत असल्याने सर्वसामान्य नागरीकातून दुकानदारांच्या या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन स्वघोषित नाणे बंदी करणाऱ्यावर रिजर्व बैंकेच्या नियमानुसार राष्ट्रीय नाणे स्वीकारण्यास नकार दिल्याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून १० रुपयाचे नाणे स्विकारण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.

गेल्या काही महिन्यापासून बाजारात १० रुपयाचे असली - नकली ( डुप्लिकेट) नाणे आल्याची अफवा पसरविण्यात आली असून, याचा भ्रम व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्ये वाढत चाललं आहे. त्याचा फटका बसू नये म्हणून शहरातील काही दुकानदाराने १० रुपयाचे बंदे(नाणे) ग्राहकाकडून घेण्यास नकार देऊन बंद झाल्याचे सांगितले जात आहे. सर्व सामान्य नागराईक आपल्याड असलेले हे नाणे व्यापाऱ्याकडे घेऊन गेल्यास नाणे घेण्यास मनाई करत हे बंद झालेले आहेत असे सांगून सामान्यांना माघारी फिरवत आहेत.

या सर्वच फटका रोज मजुरी करणारे, छोटे दुकानदार तसेच शेतकरी वर्ग, नागरीकांना या प्रकारचा नाहक त्रास होत आसल्याने यावर कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. तसेच बैंकेत गेले असता त्या ठिकाणी सुद्धा नाणे घेण्यास नकार दिला जात असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या नोटबंदीनंतर नाणे बंद झाल्याची कोणतीही माहिती अथवा सूचना दिली नसताना काहींनी नांदे बंद झाल्याची अफवा पसरून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरु केला आहे. तसेच दुकानदार सुट्टे रुपये देते वेळी मात्र दहाचे नाणे ग्राहकांच्या माथी मारून ग्राहकाकडून नाणे स्वीकारत नाहीत. याचा नाहक फटका हिमायतनगरला बुधवारी बाजारात बाजार करण्यासाठी आलेल्या ग्राहकाना बसल्याने रिकामे हाताने परत जावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांना आपल्याजवळ असलेले १० रुपयाचे नाणे घरातच ठेवण्याची वेळ आली आहे. या प्रकारचा फटका मजूरदारानाही बसत असून, जमा करून ठेवलेले नाणे चालत नसल्याने उपजिविका कशी करायची आसा प्रश्न भेडसावत आहे. रिझर्व बँकेने ताबडतोब आदेश काढुन दहाचे नाणे चलनातून बाद नाहीत ते स्वीकारले जावे तसेच नाणे न स्विकाणार्यावर योग्य कारवाई करावी अशी मागणी ग्राहक करीत आहेत.

याबाबत येथील एसबीएच शाखाधिकारी श्री अभिषेक मिश्रा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, आमच्याकडे अश्या कोणत्याही सूचना आल्या नाहीत. कायद्यानुसार १० रुपयाचे नाणे बाजारात चालतात. त्यासाठी व्यापारी व ग्राहकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सुरळीत व्यवहार करून १० चे नाणे चलनात ठेवावे असे आवाहन त्यांनी केले.

Related Photos