Breaking news

माळाकोळी आणि देगलूरच्या चोऱ्यात 62 हजारांचा ऐवज लंपास

करखेलीत चोरीचा प्रयत्न;जनसंपर्क विभागाचे कॉपी पेस्ट
नांदेड(खास प्रतिनिधी)पोलीस विभागाला आव्हान देत चोरटयांनी दोन ठिकाणी चोऱ्या करून 61 हजार 900 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.तसेच एका ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न झाला आहे.पोलिसांना चोरटे सतत आव्हान उभे करीत आहेत.पोलीस जनसंपर्क विभागाने कॉपी पेस्ट करून पुन्हा एकदा गोंधळ केला आहे.

माळाकोळी येथील राजु रावसाहेब चाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे श्रीराम क्लॉथ सेंटर व त्यांच्या भांवाचे त्रप्ती जनरल स्टेअर्स, विक्रम किराण दुकान अशी तीन दुकाने एकाच रात्री दिनांक 17 मार्च रोजी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी फोडले आहे.या तीन दुकानांच्या गल्ल्यातील रॉक रक्कम 28 हजार 900 रुपये चोरून नेली आहे.माळाकोळी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस उप निरीक्षक शेख हे करीत आहेत.

देगलूर येथील साईबाबा बापुराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते 17 मार्च रोजी मध्यरात्री नंतर आपल्या घरास कुलूप लावून ते बिदर येथे बहिणीच्या लग्नासाठी गेले होते.या संधीचा फायदा चोरटयांनी घेतला आणि त्यांचे घर फोडले शेजाऱ्यांनी फोनवर माहिती दिली.त्या नंतर त्यांनी घरी येऊन पाहणी केली असतांना दिसले की, घराचे कुलूप तोडून घरातील लोखंडी कपाटाचे दार तोडून कपाटातील सोन्याचे आणि रोख रक्कम असा एकूण 33 हजार रुपयांचा ऐवज कोणीतरी चोरटयांनी लांबवला आहे.देगलूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस हवालदार पठाण हे करीत आहेत. गोविंद विठ्ठलराव शंकरवार रा.कारखेली ता.धर्माबाद यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 18 मार्च च्या रात्री 3 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरावर चढून घरातील सामान चोरण्याचा प्रयत्न केला.तसेच इतर घरावर सुद्धा चोरांनी तसाच चोरी करण्याचा प्रयत्न केला.चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला तेव्हा चोरटयांनी दार उघडे ठेवून निघून गेले. धर्माबाद पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस हवालदार पठाण हे करीत आहेत.

जनसंपर्क विभागाची कॉपी पेस्ट सवय जाता जाईना
-----------------------------
देगलूर चोरी आणि कारखेली ता.धर्माबाद येथील चोरीचा प्रयत्न या दोन वेग वेगळ्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा तपास पोलीस हवालदार पठाण ब.न.558 हे करीत आहेत असे प्रेसनोट मध्ये लिहिले आहे.या पोलीस हवालदार पठाण यांचा मोबाईल नंबर सुद्धा .9890498382 असल्याचे लिहिले आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क विभागात कॉपी पेस्ट करण्याची लागलेली सवय जाता जाईना झाली आहे.आणि त्यामुळेच असे प्रकार वारंवार घडत आहेत.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांकडे लक्ष येण्याची गरज आहे.स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांवर जशी कडक कार्यवाही केली त्याच प्रमाणे जनसंपर्क विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही का होत नाही असा प्रश्न पोलीस दलातील लोक बोलत आहेत.

Related Photos