Breaking news

पाणी पुरवठा योजनेत 94 लाखांचा अपहार

नांदेड(खास प्रतिनिधी)ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत मंजुर झालेला 94 लाख रूपयांचा निधी परस्पर उचलून घेतला. या प्रकरणी तिघांविरूद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाऱ्हाळी येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजना मंजुर झाली होती. या कामासाठी 94 लाख 72 हजार 555 रूपयांचा निधी मंजुर झाला. जिल्हा परिषदेच्यावतीने धनादेश क्र. 283149 नुसार देण्यात आला. परंतु संबंधितांनी पाणीपुरवठा योजनेचे कोणतेही काम न करता स्वत: च्या नावावर वटवून घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या उपविभागीय अभियंता प्रकाश गणपत जोगदंड यांनी मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सपोनि इंद्राळे करीत आहेत.

Related Photos