Breaking news

एलआयसीचे निवृत्त शाखाधिकारी शिवलाल राठी यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)स्वातंत्र्यदिनी आपल्या घरी झेंडावंदनाचा कार्यक्रमठेवून देशाच्या प्रती अभिमान बाळगणारे भारतीय जीवन विमा निगमचे निवृत्त शाखाधिकारी तथा शहरातील प्रख्यात मुत्ररोगतज्ञ डॉ. सुशिल राठी यांचे वडील शिवलालजी राठी यांचे सोमवार दि. 20 मार्च रोजी निधन झाले. ते 76 वर्षाचे होते. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. 21 मार्च रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह मार्गावरील ‘वेदांत’ या त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे.

भारतीय जीवन विमा निगमअर्थात एलआयसीत एजंट ते शाखाधिकारी असा प्रवास राहिलेले शिवलालजी हे अत्यंत शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जायचे. ‘योगक्षमं वहाम्यहम’ हे ब्रिद डोळ्यासमोर ठेवून निष्ठेने कामकेलेल्या शिवलालजी यांच्या हाताखाली शेकडो एजंट घडले. एजंटना लोकाभिमुख करणे, त्यांना प्रशिक्षीत करणे, योजनांचे महत्त्व पटवून देणे हे आपले कर्तव्य समजून पार पाडलेल्या कामामुळेच शिवलालजी यांचे नाव एलआयसी परिवार व एजंटामध्ये आजही आदराने घेतले जाते. स्वातंत्र्यदिनी शासकीय व निमशासकीय कार्यामध्ये झेंडावंदन होत असताना शिवलालजी हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या घरी झेंडावंदनाचा कार्यक्रमसाजरा करायचे. त्यातून त्यांची आपल्या राष्ट्राविषयी असलेली निष्ठा व प्रेमदिसून यायचे. यासाठी ते वेगवेगळ्या राज्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांना निमंत्रीत करुन त्यांची भाषणे ठेवायची. या राष्ट्रभावने बरोबर हिंदी भाषेवरही त्यांचे खुप प्रेमहोते. हिंदी भाषेवर चांगले प्रभूत्व राहिल्याने हिंदी दिनाबाबत शिवलालजी यांच्या मनात एक वेगळी आस्था होती. शहरातील विविध समाजपयोगी उपक्रमात त्यांचा नेहमीच सहभाग असायचा. प्रसिध्द मुत्ररोगतज्ञ डॉ. सुशिल राठी यांचे ते वडील होत.

Related Photos