Breaking news

अपंग बांधवाच्या विविध मागण्यासाठी जिल्हा परीषद समाजकल्याण विभाग वर २२ रोजी प्रहारचा हल्लाबोल..!*

नांदेड(प्रतिनिधी)जिल्हातील सर्व अपंग बांधव आणि भगिनीची जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाचा निधी 20 मार्च 2017 पुर्वी 3% निधी खात्यावर जमा करण्याचे आश्वासन अति.मुख्य कार्यकारी अधिकारी व समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यानी शेकडो अपंगाना दिले होते. या वेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पदअधिकारी व इतर संघटनेचे पदअधिकारी देखील उपस्थित होते. त्यामुळे आश्वासनाची अमलबजावनी झाली नसल्यामुळे दिनांक 22 मार्चला 2017 रोजी जिल्हा परिषद नांदेड .ATMच्या बाजुस अपंग सहाय्यता केंद्र येथे सकाळी 11:00 वाजता बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत 3% निधी, बस पास,बिजभांडवल,विवाह अानुदान,नवीन अपंग प्रहारची कार्यकारीणी गठीत संदर्भात व ११ एप्रिल च्या शेतकरी आसुड मोर्चाची रणनीती बाबत चर्चा पण होणार आहे तरी आंदोलनास इतर बाबीवर चर्चा होणार आहे.लगेच त्याच दिवशी सर्वाच्या सहमतीने दुपारी 12:00 वाजता आक्रमक आदोलन होणार आहे.

आणि लगेच आंदोलन तिव्र करुन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड या कार्यालयाला ताळे ( कुलूप ) लावण्यात येणारआहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग बांधवानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन प्रहार अपंगचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे पाटील,नव्याने प्रवेश केलेले युवा कार्यकर्ते बालाजी पाटील ढोसणे,राहुल साळवे,अमरदीप गोधणे,दऊबाई गोधणे यांनी केले.

अपंगाच्या मागण्या तात्काळ सोडवा अन्यथा तिव्र आंदोलन छेडु : बालाजी पाटील ढोसणे
----------------------
अपंगाच्या मागण्याकडे अधिकारी व लोकप्रतिनिधी हे जाणीवपुर्वक दुलर्क्ष करत असुन त्यांच्या मागण्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे नाहीतर प्रहार च्या वतीने मोठे आंदोलन छेडु असे प्रहारचे युवा कार्यकर्ते बालाजी पाटील ढोसणे यांनी प्रसिध्दीपञकाद्वारे कळविले आहे.

Related Photos