Breaking news

जिल्हाधिकारी कार्यालया समोरून उपोषणकर्ता झालेला आहे बेपत्ता

नांदेड(खास प्रतिनिधी)३ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणारा एक ३६ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाला आहे. वजिराबाद पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सौ.सविता दादाराव पोहरे यांनी दिलेल्या खबरी नुसार त्या आणि इतर काही मंडळी आपल्या न्याय मागण्यासाठी दिनांक ३ मार्च २०१७ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत.त्यात त्याचन्हे पती दादाराव पांडुरंग पोहरे (३६) हे सुद्धा होते.दिनांक १० मार्चच्या रात्री ९ वाजेपासून दादाराव हे उपोषण स्थळापासून बेपत्ता झाले आहेत. वजिराबाद पोसलंय या संदर्भाने मिसिंग क्रमांक ११/२०१७ दाखल केला आहे.याबाबतचा तपास पोलीस हवालदार एस.ए.आडे हे करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार बेपत्ता व्यक्ती दादाराव पोहरेचे वय ३६ वर्ष आहे.रंग काळा आहे.उंची ५ फूट आहे.बांधा सडपातळ आहे.त्यांनी निळा टी शर्ट आणि कॉफी रंगाची पैंट परिधान केलेली आहे.पोलिसांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की,या व्यक्तीस कोणी पाहिले तर त्यांनी वजिराबाद पोलिसांशी,पोलीस हवालदार आडे यांना संपर्क करून माहिती द्यावी.तसेच वजिराबाद पोलीस ठाण्याचा दूरध्वनी क्रमांक ०२४६२ २३६५०० वर सुद्धा माहिती देता येईल असे आवाहन वजिराबादचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी केले आहे.

Related Photos