Breaking news

ज्यु जाँनी लिव्हर 'म्युझिकल वल्ड' साठी दक्षिण अफ्रीकेला

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)नायगावचा भुमिपुत्र असलेला ज्यु जाँनीलिव्हर हा 'मुँझिक वल्ड' या म्युझिकल शो साठी मेलोडी किंग कुमार सक्सेना यांच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रीकेच्या दौ-यावर जात असून तेथील गयाना शहरात अनेक ठिकाणच्या कार्यक्रमात ज्यु. जाँनी मिमीक्री करणार आहे. त्याचा हा दहावा विदेश दौरा असून यापुर्वी ९ देशात त्याने आपली कला सादर केली आहे.

नायगाव येथील असलेला रामेश्वर भालेराव हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्युनियर जाँनी लिव्हर या नावाने ओळखला जातो. ज्यू. जानी या टोपण नावाने भालेराव यांनी देशात व विदेशात अनेक शो केले आहेत. नकला करण्यात अव्वल असलेल्या भालेराव यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटात बहारदार मिमीक्री केली आहे. त्याच्या बहारदार मिमीक्रीमुळे म्युझिकल शो चे आयोजन करणा-या अनेक नामांकित डायरेक्टर्सनी भालेराव याला सोबत घेवून शो केलेले आहेत. भालेराव यांने नामांकित डायरेक्टर सोबत यापुर्वी ९ देशात आपली कला सादर केली असून. मेलोडी किंग कुमार सक्सेना यांनी दक्षिण अफ्रीकेतील काही शहरात 'म्युझिक वल्ड' या शो चे आयोजन केले असून गायक, डांसर यांच्यासह बरीच मोठी टिम उद्याला दक्षिण अफ्रीकेला जात असून तेथील शो मध्ये मिमीक्री करण्यासाठी सक्सेना यांनी नायगावचे भुमिपुत्र ज्यु. जाँनु लीव्हर ( रामेश्वर भालेराव ) यांची निवड केली आहे.

दक्षिण अफ्रीकेतील शो साठी भालेराव यांची निवड झाल्याबद्दल आ. वसंतराव चव्हा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत तर उपनगराध्यक्ष विजय चव्हाण यांनी सत्कार केला. यावेळी गटनेते सुधाकर शिंदे, नगरसेवक रमेश शिंदे, पांडू चव्हाण, हनमंत बोईनवाड, किशन लखपत्रेवार, श्रीनिवास शिंदे, पंढरी भालेराव, शरद भालेराव, विजय भालेराव, संजय चव्हाण यांच्यासह शेषेराव आनेराये यांची उपस्थिती होती.

Related Photos