logo

नांदेड, मुदखेड तालुक्यातील माळकोठा शिवारातून 26 जून ते 27 जून दरम्यान बैल चोरुन नेणाऱ्या एका चोरट्याला मुदखेडचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एन.सामले यांनी 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 

शंकर गोविंदराव शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27 जूनच्या सकाळी 6 ते 27 जूनच्या सकाळी 6 वाजेदरम्यान त्यांच्या माळकोठा शिवारात आखाड्यावर  बांधलेले दोन बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले या बाबत गुन्हा दाखल झाला. बैल चोरुन नेल्यानंतर या चोरट्याने ते चोरलेले बैल विक्रीसाठी आणले. परंतू त्याची सर्व कागदपत्रे शंकर शिंदे यांच्या नावाने होती. तेंव्हा त्यास पकडण्यात आले. पकडलेल्या चोरट्याचे नाव हणमंत नागोराव शिंदे रा.जोमेगाव ता.लोहा असे आहे. मुदखेडचे पोलीस हवालदार संजय अटकोरे आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी वानोळे यांनी चोरट्याला मुदखेड न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश सामले यांनी दोन बैल चोरुन नेणाऱ्या हणमंत शिंदेला दोन दिवस अर्थात 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. मागील कांही दिवसापासून आखाड्यावर बैल चोरीचे प्रमाण वाढले होते. नांदेडच्या कांही जणांनी परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून अनेक बैल चोरु आणले आहेत. सध्या ते तुरुगांत आहेत. लिंबगाव हद्दीतून सुध्दा कांही दिवसापुर्वी बैल चोरीला गेले होते. त्याचाही पत्ता अद्याप लागला नाही. मुदखेड पोलीसांनी आणि बैल मालक शिंदे यांनी प्रयत्न करुन चोरीला गेलेले दोन बैल परत मिळविले आहेत

    Tags