logo

नांदेड, येथील रिपाई एकतावादी या तिरंगा चौकातील पक्ष कार्यालयात दत्ता जगतकर, नरवाडे श्रावण, प्रकाश खाडे व सौ. अनिता गोडबोले यांनी रिपाइर्ं एकतावादी पक्षात प्रवेश घेतला.

वजिराबाद येथील पक्ष कार्यालयात एक महत्वपुर्ण बैठक पक्षाचे मराठवाडा उपाध्यक्ष अशोक हिंगोले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. याप्रसंगी नांदेड जिल्हाध्यक्ष नामदेवराव हाटकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलींद हिंगोले, ईश्वर चित्रपुर, शंकरसिंह ठाकूर, शहरअध्यक्ष नामदेव दिपके, मुदखेड तालूका अध्यक्ष दत्तराम राहेरे, युवा जिल्हाध्यक्ष नंदु खाडे इत्यादिंसह आदिंची उपस्थिती होती. याबैठकीत जगतकर दत्ता यांची जिल्हा सरचिटणीस पदी, श्रावण नरवाडे यांची जिल्हा संघटक पदी, प्रकाश खाडे यांची शहर सचिव व सौ.अनिता गोडबोले यांची शहरअध्यक्ष, महिला आघाडी या पदी निवड करण्यात आली.

    Tags