logo

नांदेड, मुदखेड येथील कालिजी मंदिराची दानपेटी दोन चोरट्यांनी काल रात्री उचलून नेली आहे.

मुदखेडच्या मठगल्ली परिसरात रणछोड मंगल कार्यालय आहे. या मंगल कार्यालयाशेजारीच कालिजी मंदिर आहे. काल रणछोड मंगल कार्यालयात लग्न होते.  रात्री या मंदिराची दानपेटी दोन चोरट्यांनी उचलून नेली. ही घटना सकाळी मंदिराच्या पुजाऱ्याच्या लक्षात आली. त्यानंतर या मंदिरातील सीसी कॅमेरे पाहिले असता त्यात चोरटे मंदिराची दानपेटी उचलून नेताना स्पष्ट दिसत आहेत. मुदखेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र.190/2017 दाखल केला असून तपास सुरु केला आहे.
    Tags