BREAKING NEWS

logo

नांदेड (एनएनएल) मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (मगरे) येथील अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह व स्मारकाच्या नियोजित जागेवर ग्रामपंचायतने ताबा करून समाज मंदिराचे बांधकाम सुरू केले आहे. ते बांधकाम तात्काळ  थांबवून अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह त्या ठिकाणी बांधण्यात यावे यासाठी दि.10 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकर्‍यांनी उपोषण सुरू केले आहे.

मौजे पिंपळकौठा (मगरे) येथे मागील 30 वर्षापासून अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक स्मारकाच्या ठिकाणी दरवर्षी जयंतीनिमित्त ध्वजारोहन करून अण्णाभऊ साठे जयंती साजरी केली जाते. 100 बाय 100 फूट जागा असून सदरील जागेची ग्रामपंचायतीच्या नमुना नं.8 ला नोंद नाही. याचा फायदा घेत ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवकांनी अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या नियोजित जागेवर कब्जा करून त्या ठिकाणी समाज मंदिर बांधण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे मातंग समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्या जागेवर होणारे बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे व त्या जागेची ग्रामपंचायत नमुना नं.8 वर नोंद घेवून अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक सभागृह बांधण्यात यावे यासह आदी मागण्यासाठी विश्वनाथ फावडे, प्रल्हाद फावडे, धोंडीबा फावडे, शिवाजी फावडे, आनंदा धसाडे, भुजंग धसाडे, मरीबा टिक्केकर, गंगाधर धसाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.10 पासून उपोषण सुरू केले असून प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्याने उपोषण सुरूच आहे.

    Tags