LOGO

अडचणीतल्या महिलांसाठी हक्कांचा शासकीय आधार

प्रतिनिधी - 2017-05-08 20:17:26 - 185

नांदेड, महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत नांदेड शहरात माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) ही शासकीय संस्था अनाथ, निराधार, निराश्रीत व अत्याचार पिडीत महिलांसाठी कार्यरत आहे. अशा महिला समस्यांचे निराकरण होईपर्यंत येथे आश्रय घेऊ शकतात, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

या संस्थेत 18 ते 60 वर्षे या वयोगटातील निवाऱ्याची आवश्यकता असणाऱ्या अनाथ, निराधार, निराश्रीत, कुमारीमाता, परितक्त्या , अत्याचार पिडीत महिलांसाठी विनाशुल्क अन्न, वस्त्र, निवारा, समुपदेशन व पुनर्वसनाची व्यवस्था केली जाते. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाते. आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला व मदत दिली केली जाते. तसेच नियमित आरोग्य तपासणी केली जाते. 18 वर्ष वयांवरील महिलांना मानसिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्टया सक्षम व स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच पुनर्वसनाच्या दृष्टीने त्यांच्या विवाहाकरीता संस्थेत सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. समस्याग्रस्त महिलांनी संकटकाळी चुकीच्या मार्गानी न जाता समस्येचे निराकरण होईपर्यत अल्प कालावधीसाठी या संस्थेत दाखल होण्याचा फायदा घ्यावा. येथे प्रवेशाकरीता फोटोसह ओळखपत्र आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कामकाजाच्या दिवशी दुपारी 1.00 ते 3.00 या वेळेत अधिक्षक, माता अनुसया शासकीय महिला वसतीगृह (राज्यगृह) भाईजी, पॅलेसच्य पाठीमागे, शिवाजीनगर उडडाणपुल परिसर शिवाजीनगर, नांदेड येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top