सानेगुरूजी जयंतीनिमित्त बाबनवाडी येथे आनंददायी शाळा

भोकर (प्रतिनिधी) तालुक्यातील भोसी केंद्राअंतर्गत येत आसलेल्या बाबनवाडी येथे सानेगुरुजी यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रमाने आनंदशाळा साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात अभिवाचनाने झाली.

'शामची आई' या पुस्तकातील एक गोष्ट मुलांना सअभिनयाने सांगण्यात आली.नंतर रंगकामासाठी सर्व मुलांना फळे उपलब्ध करून देण्यात आले.मुलांनी मनमुराद पणे त्या फळ्यावर सुंदर चित्रे काढली. अभिनव आनंदशाळा या उपक्रमात मुलांना अधिक आनंद मिळण्याच्या हतुने रंगीबेरंगी कागद पुरविण्यात आले. मुलांनी त्या कागदांपासुन चटई,होडी साहित्य बनवले.या आनंदशाळेच्या निमित्ताने शाळेचे मुख्याध्यापक शिवानंद वाडकर यांनी फळ्यावर साने गुरुजींचे रेखाचित्र काढले.सहशिक्षक शिवाजी देशमुख यांनी मुलांना सअभिनयाने गोष्ट सांगितली.

Related Photos