Breaking news

बारड येथे अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम

नांदेड(प्रतिनिधी)बारड येथे श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला असून श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहानिमित्त सकाळी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी गाथा भजन, श्रीमद्‌ भागवत कथा, हरिपाठ, हरिकीर्तन, भजनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वरी वाचन हभप. दिगंबर महाराज वरूडकर करणार असून भागवत कथा वाचन दिगंबर महाराज संगुचीवाडी हे करणार आहेत. अखंड हरिनाम सप्ताहात दि. 24 रोजी हभप रवी चव्हाण आळंदीकर, दि. 25 रोजी हभप ऍड. यादवराव वाईकर, दि. 26 रोजी हभप खडसे महाराज इंदुरीकर, दि. 27 हभप बाबु महाराज काकांडीकर, दि. 28 हभप रामेश्वर महाराज जालनेकर, दि. 29 हभप चंद्रकांत महाराज उस्माननगरकर, दि. 30 रोजी हभप प्रकाश साठे बीडकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सद्‌गुरू राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दि. 29 जानेवारी रविवारी सायंकाळी 4 वाजता प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. श्री भगवान विघ्नहर्ता गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा दि. 30 जानेवारी सोमवारी श्री 108 सद्‌गुरू वेदांताचार्य सिद्धीलिंग शिवाचार्य महाराज स्वामीजी यांच्या विधीवत मंत्रोच्चारातून करण्यात येणार आहे. श्री ज्ञानेश्वरी पालखी तसेच कलश मिरवणूक सकाळी 10 वाजता काढण्यात येणार आहे. गणेश मंदिराचा कलशारोहण दि. 31 जानेवारी मंगळवारी संत बाबा बलविंदरसिंघजी गुरूद्वारा लंगरसाहेब, श्री 108 महंत रामचरणदासजी त्यागी, मुख्य विश्वस्त श्रीक्षेत्र हनुमानगड, वैराग्यमूर्ती दत्ताबापू महाराज हदगावकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

काल्याचे कीर्तन हभप माऊली महाराज मुडेकर यांचे होणार असून गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचकोशीतील भाविकभक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन विघ्नहर्ता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कोरबनवाड, रामेश्वर कोरबनवाड, संजय मालीपाटील, प्रताप देशमुख, सुरेश देशमुख, विठ्ठल देशमुख, दत्तराव टिपरसे, मारोती कोरबनवाड, कचरू कोरबनवाड, सिताराम कोरबनवाड, मधुकर कोरबनवाड, पुंडलिक कोरबनवाड, माधव कोरबनवाड यांच्यासह गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Photos