Breaking news

उद्यापासून जामदरी टेकडीवर ग्रामगीता तत्त्वज्ञान शिबिरास प्रारंभ

नांदेड(खास प्रतिनिधी)राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रणीत व ब्रम्हलीन संत कर्मयोगी प. पू. तुकारामजी दादा गीताचार्य यांच्या प्रेरणेने ग्रामगीता तत्त्वज्ञान शिबिर 25 ते 27 जानेवारी दरम्यान अध्यात्म गुरूकुल जामदरी टेकडी ता. भोकर येथे आयोजित करण्यात आले आहे.

यावेळी डॉ. राजाभाऊ मुंगलीवार, चंद्रभान पाटील जवळेकर, दत्तराम महाराज यांची उपस्थिती राहणार आहे. 25 जानेवारी बुधवारी दुपारी 4 वाजता चंद्रकांत पाटील जावळेकर व गणपत गुरूजी भिसीकर यांचे मार्गदर्शन होईल. रात्री 10 वाजता राष्ट्रीय कीर्तन ज्ञानेश्वर महाराज केसाळे सातसंगत, 26 रोजी कार्यकर्ता चिंतन बैठकीत वैद्य, गाजेवार, राजेंद्र दवणीकर, खामनकर यांचे मार्गदर्शन, 27 रोजी ग्रामगीता काळाची गरज यावर गोविंदराव पाटील टेंबीकर यांचे मार्गदर्शन होईल. दुपारी 11 वाजता काल्याचे कीर्तन ज्ञानेश्वर महाराज केसाळे यांचे होईल. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Photos