श्रीगणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात शिवलिंग शिवाचार्य महाराज्यांचे प्रवचन

नांदेड(प्रतिनिधी)बारडनगरीत श्री विघ्नहर्ता गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त दि. 29 जानेवारी रविवारी सायंकाळी 4 वाजता राष्ट्रसंत सद्‌गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले असून पंचक्रांशीतील भाविक भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सुंदर मंदिरात दि. 30 जानेवारी सोमवारी सकाळी 10 वाजता श्री.स.ब्र. 108 सद्‌गुरू वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेडकर यांच्या विधीवत मंत्रोच्चारातून करण्यात येणार आहे. ज्ञानेश्वरी पालखी तसेच कलशाची गावातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. कलशारोहण दि. 31 जानेवारी मंगळवारी सकाळी 11 वाजता संत बाबा बलविंदरसिंघ गुरूद्वारा लंगरसाहेब, श्री 108 महंत रामचरणदासजी त्यागी, मुख्य विश्वस्त श्रीक्षेत्र हनुमानगड, वैराग्यमूर्ती दत्ताबापू महाराज हदगावकर, सद्‌गुरू वेदांताचार्य श्री.स.ब्र. 108 दिगांबर शिवाचार्य महाराज वसमतकर यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात हभप दिगंबर महाराज वरूडकर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन केले आहे. भागवत कथेतून दिगंबर महाराज संगुचीवाडी यांनी सत्‌संगातून भक्तांना आदर्श जीवन जगण्याचा मार्ग सांगितला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता दि. 31 जानेवारी मंगळवारी हभप माऊली महाराज मुडेकर यांच्या कीर्तनाने करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विघ्नहर्ता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कोरबनवाड, रामेश्वर कोरबनवाड, संजय मालीपाटील, प्रताप देशमुख, सुरेश देशमुख, विठ्ठल देशमुख, दत्तराव टिपरसे, मारोती कोरबनवाड, कचरू कोरबनवाड, सिताराम कोरबनवाड, मधुकर कोरबनवाड, पुंडलिक कोरबनवाड, माधव कोरबनवाड यांच्यासह गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Photos