Breaking news

खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांची दादागिरी वाढली

भोकर(मनोजसिंह चौव्हाण)शहरातील मुख्य रस्त्यावर बेशिस्त खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांची दादागिरी वाढली असून दुकानासमोर उभे केलेले वाहन काढण्याची विनंती करणाऱ्या व्यापाऱ्यांना दमदाटी करण्याचा प्रकार वाढला आहे. तरीदेखील भोकर पोलिस स्थानकाची वाहतुक शाखा खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना पाठिशी घालत आहे. परिणामी मुख्य रस्त्यावर लाखो रुपयांची गुंतवणूक करून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना मुकाट्याने त्रास सहन करत व्यापार करावा लागत आहे. परंतु पोलिसाकडुन व्यापाऱ्यांना सहकार्य मिळत नसल्याने नाराजीचा सूर निघत आहे.

भोकर शहरातील मुख्य रस्त्यावर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी बेशिस्तीचा कळसच काठला असुन, आपल्या ताब्यातील वाहने मनमानी करत व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर किंवा रस्त्यावर वेडीवाकडी उभी करत वाहतुकीस आणि पादचाऱ्यास अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे भोकरमधील मुख्य रस्ता वाहनधारकांच्या विळख्यात सापडला आहे. लाखो रुपये गुंतून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी बस्तान मांडल्याने याचा परीणाम व्यापारावर होत आहे. हि सर्व परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहत आसतानाही पोलिसांची वाहतुक शाखा कुठलीच कार्यवाही करीत नाही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नाममात्र मर्यादित वाहनावर कार्यवाही केल्या जाते. पोलिस यंत्रणा खाजगी वाहनधारकांना पाठिशी घालत आसल्याने या चालकांची चांगलीच दादागिरी वाढली आहे. गेल्या बुधवारी किनवट रस्त्यावरील गोविंदराज क्लाँथ सेंटर या दुकानासमोर हिमायतनगर तालुक्यातील पारवा येथुन भोकर शहरात प्रवाशी वाहतुक करणाऱ्या एका अॅटो चालकाने आपले वाहन बेशिस्तपणे दुकानासमोर उभे केले होते. त्यामुळे सदरील दुकानदाराने उभा केलेला अॅटो बाजुला घ्या अशी विनंती केली. मात्र अॅटो चालकाने आणि सोबतच्या इसमांनी व्यापाऱ्यास आणि त्या दुकानामधील इसमास दमदाटीची भाषा करून धमकवण्याचा प्रयत्न केला. असे प्रकार दररोज दिवसभरातुन अनेक वेळा व्यापाऱ्यासोबत होत आहेत. मात्र येथील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरल्याने व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

भोकर शहरातील मुख्य रस्त्यावरील बेशिस्त वाहनधारकांची समस्या वाढत आसताना यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यश येत नाही. खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठिकाण उपलब्ध नसल्याची ओरड होत आहे. मात्र या बेशिस्त वाहनधारकांना शिस्त लावण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनाची आसतानाही याकडे डोळेझाक करीत आहेत. येथे नव्याने आलेले पोलिस निरीक्षक संदीपान शेळके रुजू होताच वाहतुकीच्या समस्येची दखल घेतली अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही याबाबत काहीही हालचाल दिसुन येत नसल्याने बेशिस्त वाहनधारकांचा त्रास आणि दादागिरीचा प्रकार वाढल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत व्यापाऱ्यातुन नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

Related Photos