Breaking news

बारड येथे श्रीगणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा...कलशाची भव्य मिरवणूक

नांदेड(प्रतिनिधी)बारड येथे विघ्वहर्ता श्री गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठा भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता सोमवारी कलशाची भव्य मिरवणूक काढून करण्यात आली. ग्रामस्थांच्या लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मंदिराची फुलांनी सजावट करण्यात आली होती. श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्इा सोहळ्याची सुरूवात मंडलदेवता पूजेने करण्यात आली. शोभायात्रा काढण्यात येऊन होमहवन करण्यात आला. यामध्ये 9 जोडप्यांनी सहभाग घेतला होता. श्री गणेश मूर्तीची श्री स.ब्र. 108 सद्‌गुरू वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य स्वामीजी साखरखेडेकर यांच्या विधीवत मंत्रोपचारातून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

ज्ञानेश्वरी पारायणचे अधिष्ठान हभप. दिगांबर महाराज वरूडकर, श्रीमद भागवत कथाकार दिगांबर महाराज संगुची वाडी यांना ग्रामस्थांच्या वतीने वस्त्र आहेर प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नव्याने उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिरात सिंहासनावर मूर्तीची स्थापना विधीवत परंपरेनुसार करण्यात आली. वैदिक पुरोहित निळकंठ स्वामी, नंदकिशोर किर्तनकर, विश्वनाथ स्वामी, गंगाधर स्वामी, ओंकार स्वामी, ईश्वर स्वामी, संतोष स्वामी, नारायण मठपती यांनी मंत्रोपचार विधीत सहभाग घेतला होत. ज्ञानेश्वरी पारायण तसेच श्रीमद भागवत कथा सांगतानिमित्त कलशाची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. गावात ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात येऊन कलशाची पूजा करण्यात आली. या मिनवणुकीत महिलांच्या लेझीम पथकाने सहभाग घेतला होता. विश्वनाथ स्वामी यांच्या शंखनादाने ग्रामस्थाचे लक्ष वेधून घेतले होते. ढोलताशांच्या गजरात, टाळमृदंगाच्या वारकरी संप्रदायाच्या अभंगवानीने सर्व परिसर भक्तीमय वातावरणाने फुलून गेला होता.

श्री विघ्नहर्ता गणेश मंदिराच्या कलशारोहण सोहळ्याचे मंगळवार, दि. 31 जानेवारी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे. मुख्य बाजारपेठेतील शिवबागचा राजा गणेश मंदिराचा कलशारोहण सोहळा करण्यात येणार आहे. कलशापूजन संतबाबा बलविंदरसिंघजी गुरूद्ववारा लंगर साहेब, श्री 108 महंत रामचरणदास त्यागी महाराज मुख्य विश्वस्त श्रीक्षेत्र हनुमानगड देवस्थान, वैराग्यमूर्ती प.पू. दयाबापू महाराज हदगावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली महाराज मुडेकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन विघ्नहर्ता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कोरबनवाड, रामेश्वर कोरबनवाड, संजय मालीपाटील, प्रताप देशमुख, सुरेश देशमुख, विठ्ठल देशमुख, दत्तराव टिपरसे, मारोती कोरबनवाड, कचरू कोरबनवाड, सिताराम कोरबनवाड, मधुकर कोरबनवाड, पुंडलिक कोरबनवाड, माधव कोरबनवाड यांच्यासह गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Photos