Breaking news

अनैतिक संबंध प्रकरणी एक वर्षाची शिक्षा

नांदेड(प्रतिनिधी)प्राथमिक न्यायालयाने अनैतिक संबंधासाठी तिन वर्षाची दिलेली शिक्षा थोडी कमी करून सहावे जिल्हा न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांनी एक वर्षाची शिक्षा कायम केली आहे.

मुदखेड तालुक्यातील जवळा मुराद येथील घटना 30 मार्च 2007 रोजची असून यात फिर्यादी राजू पंढरीनाथ भिसे यांनी फौजदारी न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून यात आरोपी प्रभाकर कोंडीबा भिसे त्यावेळचे वय 24 हा आरोपी फिर्यादीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध करीत असतांना आढळून आला. यावरून फिर्यादी याने फौजदारी न्यायालात फिर्याद दिली होती. याबाबत फौजदारी न्यायाधीश चंद्रपाल बलवाणी यांच्या न्यायालयात हा खटला चलला असता यात तीन साक्षीदार तपासले असता व भक्क पुराव्याच्या आधारे यातील आरोपी प्रभाकर कोंडीबा भिसे रा.जवळा मुर्द, ता.मुदखेड यांना तिन वर्षाची शिक्षा ठोठावली होती. यात फिर्यादीने जिल्हा सत्र न्यायालयात 2009मध्ये अपील दाखल केले होते. दि.31 जानेवारी 2017 रोजी जिल्हा सत्र अतिरिक्त सहावे न्यायालय न्यायाधीश हरीभाऊ वाघमारे यांच्या न्यायालयात देखील आरोपी प्रभाकर कोंडीबा भिसे यांची शिक्षा कमी करून एक वर्षाची कल 497 भादविप्रमाणे शिक्षा कायम ठेवली आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाकडून ऍड.डी.जी.शिंदे यांनी काम पाहिले.

Related Photos