Breaking news

बारडला कलशारोहण सोहळ्याची उत्साहात सांगता..महाप्रसाद वाटप

नांदेड(प्रतिनिधी)बारड नगरीत ग्रामस्थांच्या लोकसहभाग व श्रमदानातून उभारण्यात आलेल्या श्री गणेश मंदिर कलशारोहण सोहळा वैराग्यमूर्ती प.पू. दत्ताबापू महाराज हदगावकर तसेच श्री 108 सद्‌गुरू वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले असून सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करून सोहळ्याची उत्साहात सांगता करण्यात आली.

विघ्नहर्ता गणेश मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा तसेच कलशारोहण सोहळ्यानिमित्त दि. 24 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत विधीवत मंत्रोपचारातून कलशारोहण सोहळा पार पडला. यावेळी होमहवन पूजा व सामूहिक महाआरती करण्यात आली. यानंतर हभप दिगांबर महाराज संगुची वाडी यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

शिवबागचा राजा गणेश मंदिराचा कलशारोहण श्री 108 सद्‌गुरू वेदांताचार्य सिद्धलिंग शिवाचार्य स्वामी साखरखेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गंगाधर स्वामी यांनी मंत्र पूजापाठ केला. विघ्नहर्ता श्री गणेश मंदिराचा कलशारोहण वैराग्यमूर्ती प.पू. दत्ताबापू महाराज हदगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. विघ्नहर्ता विश्वस्त मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या गणेशमूर्ती प्रतिमेचे प्रकाशन करण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद वाटपासाठी महिलांनी तसेच युवकांनी पुढाकार घेतला होता.

कलशारोहण यशस्वीतेसाठी विघ्नहर्ता विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कोरबनवाड, रामेश्वर कोरबनवाड, संजय मालीपाटील, प्रताप देशमुख, सुरेश देशमुख, विठ्ठल देशमुख, दत्तराव टिपरसे, मारोती कोरबनवाड, कचरू कोरबनवाड, सिताराम कोरबनवाड, मधुकर कोरबनवाड, पुंडलिक कोरबनवाड, माधव कोरबनवाड, पांडुरंग लोणवडे, बजरंग फुलारी, नरसिंग दरबेसवार, नारायण चव्हाण, नामदेव देशमुख, किशोर पिल्लेवाड, दगडू भोकरे, एकनाथ रत्नपारखी, आशीष देशमुख, आनंदा टिपरसे, परमेश्वर कोरबनवाड, संदीप कोरबनवाड, सुनील कोरबनवाड, संतोष देशमुख यांच्यासह गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Photos