नागापूर येथे रविवार पाचव्‍या बौध्‍द धम्‍म परिषदेचे आयोजन

भोकर(मनोजसिंह चौव्हाण)भोकर तालुक्‍यातील नागापूर येथे आज रविवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी पाचव्‍या बौध्‍द धम्‍म परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. यानिमित्‍त गाथा पठण, धम्‍मदेशना, प्रवचन आदी कार्यक्रम घेण्‍यात येणार असल्‍याची माहिती आयोजन दत्‍ता व्‍यवहारे यांनी दिली.

बौध्‍द धम्‍म परिषदेत सकाळी नऊ वाजता माजी पोलीस पाटील गंगाधरराव शानमवाड यांच्‍याहस्‍ते धम्‍म ध्‍वजारोहन होईल. त्‍यानंतर दहा वाजता पुज्‍य भदंत पंय्याबोधी यांच्‍याहस्‍ते धम्‍म परिषदेचे उद्घाटन करण्‍यात येणार आहे. याप्रसंगी औरंगाबादचे पुज्‍य भदंत ग्‍यानरक्षीत, चेअरमन रुखमाजी बेरदेवाड, पोलीस पाटील बालाजी शानमवाड, नांदेड आकशवाणीचे सहाय्यक निदेशक भिमराव शेळके आदींची उपस्थिती राहणार आहे. धम्‍मदेशने नंतर दुपारी बारा वाजता गंगाधर व्‍यवहारे यांच्‍यावतीने भोजनदानाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता शाहु फुले आंबेडकरकरी चळवळीचे जेष्‍ठ नेते सुरेश गायकवाड यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जाहिर सभा होणार आहे.

यावेळी भटक्‍या विमुक्‍त महासंघाचे प्रा.डॉ. संजय बालाघाटे उपस्थिती राहणार आहेत. त्‍यानंतर रात्री नागपूर येथील गायक भिमेश भारती व वर्धा येथील गायीका सुनिता सरगम यांचा बुध्‍द भिम गितांचा कार्यक्रम होणार आहे. व्‍यवस्‍थापक भिमशाहीर साहेबराव येरेकर, समिती अध्‍यक्ष सरपंच बालाजी गंगाधर शानमवाड, उपाध्‍यक्ष माजी सरपंच बालाजी उलेवाड यांच्‍या मार्गदर्शनात हा कार्यक्रम होणार आहे. या धम्‍म परिषदेत माजी सभापती नागनाथ घिसेवाड, प्रकाशराव देशमुख, कृषी उत्‍तम बाजार समितीचे जगदिश भोसीकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य दशरथ लोहबंदे, रमेश सरोदे, संजय सवई, गोविंदबाबा गौड, एल.ए. हिरे, मिलिंद व्‍यवहारे, नागोराव शेंडगे, गोविंदराव उलेवाड, प्रा. मोहन मोरे, प्रा. पी.जे. थोटे, जी.पी. मिसाळ, डी.पी. कसबे, स.ना. भालेराव, प्रा, सुनिलचंद्र सोनकांबळे, प्रा.सौ. प्रतिभा येरेकर, बी.ए.सरोदे, भिमराव दुधारे, डॉ. साईनाथ वाघमारे, नगरसेवक मनोज गिमेकर, बाबूराव पाटील, पी.एम. तोडे, हिरामण कांबळे, शाहीर बाबुराव गाडेकर, दत्‍ता डोंगरे, गंगाधर डोंगरे, दत्‍ता पाटील, साहेबराव घुले, दत्‍ता सोनकांबळे, देवा हाटकर, विक्रम क्षिरसागर, माणिक जाधव, भागाजी जाधव, भिमराव वाघमारे, दिलीप वाघमारे, पी.एन. राजापुरकर, दशरथ भदरगे आदींची उपस्थिती राहणार आहे. धम्‍म परिषदेसाठी सल्‍लागार समिती, महिला आघाडी व युवक आघाडी परिश्रम घेत आहेत. तरी बौध्‍द धम्‍म परिषदेला जास्‍तीत जास्‍त संख्‍ये उपस्थित राहावे असे आवाहन अयोजन दत्‍ता व्‍यवहारे, प्रकाश रावळे मुकिंद लव्‍हाळे व समस्‍त गावक-यांनी केले आहे.

Related Photos