नांदेड - भोकर रस्त्यावर अपघातात उपसरपंचा मृत्यू

नांदेड(खास प्रतिनिधी)नांदेड-भोकर रस्त्यावर अमराबाद पाटीजवळ एका ट्रॅव्हल्सने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील एक जण मरण पावला आहे.तर एका जखमींवर सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे.या घटनेतील मयत हिवरा गावचे उपसरपंच आहेत.

खात्रीलायक माहितीनुसार आज दुपारी नांदेड-भोकर रस्त्यावर मोटरसायकल क्रमांक एमएच २६ झेड ७१०० वर हिवरा ता.पूर्णा चे उपसरपंच किशन ज्ञानोजी भिसे (२७) आणि त्यांचे मित्र पंकज माधव खंदारे रा.वसमत असे दोघे बसून प्रवास करीत असतांना ट्रॅव्हल्स गाडी क्रमांक एमएच ३७ बी २५५९ ने त्यांच्या मोटर सायकलला जोरदार धडक दिली.त्यात उपसरपंच किशन भिसे यांचा मृत्यू झाला आहे.महामार्ग पोलीस पथकाने जखमी पंकज खंदारे यांना नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे.बारड पोलिसांनी ट्रॅव्हल्स चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस केदार हे करीत आहेत.या अपघातातील मयत किशन भिसे हे हिवरा ता.पूर्णा या गावचे उपसरपंच असल्याचे सांगण्यात आले.

Related Photos