सप्ताहाचा भंडारा कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्याने चाळीस जणांना विषबाधा

नांदेड(खास प्रतिनिधी)भोकर तालुक्यातील नागापूर येथे सप्ताहाचे चालू असल्याने या सप्ताहाचा भंडारा कार्यक्रमातील शिळे अन्न खाल्याने चाळीस जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

नागापूर येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असते. सप्ताह समाप्तीच्या शेवटच्या दिवशी भंडारा केला जात असतो. हा भंडाऱ्याचे जेवण गावकऱ्यांना देण्यात येते. 9 फेब्रुवारी रोजी सप्ताहाचा शेवटचा दिवस असल्याने या दिवशी भंडारा म्हणून महाप्रसाद करण्यात आला होता. गावातील नागरिकांनी या भंडाऱ्याचे जेवण केले होते. पण प्रसाद म्हणून गावातील काही नागरिकांनी घरच्या व्यक्ती प्रसाद घेऊन गेले होते. रात्री भंडाऱ्यातील जेवण केल्याने शुक्रवारी सकाळी 10 गावातील नागरिकांना पोट दु:खीची समस्या सुरू झाली. यात संख्या वाढतच जाऊ लागली. यामुळे गावकऱ्यांनी रूग्णालय गाठले असता डॉक्टरांनी दुषित पाण्यामुळे ही विषबाधा झाल्याचे सांगितले. यात जवळपास गावातील 40 नागरिकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Related Photos