खरबीचे पहिले सरपंच कल्याणकर यांचे निधन

नांदेड(प्रतिनिधी)खरबी ता. भोकर येथील ग्रामपंचायतचे पहिले सरपंच विठ्ठलराव गोविंदराव कल्याणकर यांचे दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्षे होते. सोमवारी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवदेहावर खरबी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेत माजी आ. बापुसाहेब देशमुख गोरठेकर, जि.प. सदस्य प्रकाश देशमुख, प्राचार्य सू.ग. चव्हाण, नातेवाईक, साहित्यिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कै. विठ्ठलराव कल्याणकर यांनी माजी मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण, माजी आ. कै. बाबासाहेब देशमुख गोरठेकर, माजी आ. बापुसाहेब देशमुख गोरठेकर यांच्यासोबत काम केले आहे. ते झुंजवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.आ.वि. कल्याणकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, बंधू, पाच मुले, चार मुली, नातू-पणतू असा मोठा परिवार आहे.

Related Photos