दुधनवाडीत ८ मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह

नांदेड(प्रतिनिधी)मुदखेड तालुक्यातील बारडपासून जवळच असलेल्या दुधनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व रामायण सुंदरकांड पारायणाचे ८ मार्चपासून आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाची सांगता १५ मार्चला होणार आहे.

या सप्ताहात दररोज सकाळी ४ वा. काकडा भजन, सकाळी ६ वा. ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी सामुहिक पारायण, सकाळी ११. श्री तुकाराम गाथा भजन, दु. १ वा. रामायण सुंदरकांड, सायं. ५ वा. सामुहिक हरिपाठ व धुपारती, रात्रौ.८.३० वा. हरिकीर्तन व त्यानंतर हरिजागर यावेळी श्री ज्ञानेश्वरी व्यासपीठ अधिष्ठान ह.भ.प.धोंडिबा महाराज खैरनारकर यांचे राहील. या सप्ताहात दरम्यान ८ रोजी प्रकाश महाराज पुयणीकर, ९ रोजी दत्ता महाराज पांचाळ मुगट, १० रोजी अशोक महाराज तळणीकर हदगाव, ११ रोजी भगवान महाराज खापरखेडेकर, १२ रोजी बालाजी महाराज गुंडेवार सिडको, १३ रोजी भगवान महाराज शेंद्रे परभणी, १४ रोजी ज्ञानेश्वरी पारायण सांगता व भव्य शोभायात्रा तसेच वैजनाथ महाराज कागदे उमरी यांचे कीर्तन होणार आहे तर दि. १५ मार्च रोजी प्रभाकर महाराज कपाटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकरी मंडळी दुधनवाडी, ता.मुदखेड यांनी केले आहे.

Related Photos