डोंगरगावात शेतकऱ्यांसाठी भाग्यविधाता डाळ केंद्राची उभारणी

नांदेड(प्रतिनिधी)मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथे शेतकऱ्यांसाठी भाग्यविधाता शेतकरी संघाच्या वतीने डाळ प्रक्रिया केंद्राची उभारणी करण्यात आली असून जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. तुकाराम मोटे यांच्या हस्ते गुरूवार, दि. 9 मार्च रोजी उद्‌घाटन करण्यात आले. दालमित उद्योग केंद्रामुळे कृषी व्यवसायाला चालना मिळाली असून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाताला काम मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

बारड येथील भाग्यविधाता शेतकरी संघाच्या पुढाकारातून लोकसहभाग तसेच कृषी विभागाच्या शासन अनुदानातून 17 लक्ष रूपये खर्च करण्यात येऊन दालमिल उद्योग सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विभागाच्या प्रकल्प उपसंचालिका सौ. व्ही.डी. कुलकर्णी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, पंचायत समिती उपसभापती सुनील देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख माणिक लोमटे, उपसरपंच बालासाहेब देशमुख, माजी उपसरपंच प्रताप देशमुख बारडकर, युवक कॉंगे्रस विधानसभा अध्यक्ष माधव कदम, जिल्हा परिषद प्रतिनिधी संतोष वारकड, भाजप शहराध्यक्ष पप्पू सोनटक्के, नगरसेवक अशोक मामीडवार यांची उपस्थिती होती.

भाग्यविधाता शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण देशमुख बारडकर यांनी या संघाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन प्रगती अहवाल मांडला. दालमिल उद्योग केंद्रात तूर, हरभरा, उडीद, मूग शेतमालाच्या डाळीवर प्रक्रिया करण्यात येणार असून चांगल्या प्रतीची डाळ अल्प दरात शेतकऱ्यांना काढून मिळणार आहे. शेतकरी संघाच्या वतीने शासन दराप्रमाणे 50 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून उच्च प्रतीची डाळ कमी दरात बाजारपेठेत उपलब्ध करून देण्यासाठी संघाचा प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

भाग्यविधाता डाळ प्रक्रिया केंद्रातील मशीनची पाहणी कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी डाळ प्रक्रिया करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सूत्रसंचालन कृषी केंद्रचालक शरद देशमुख यांनी केले. तर आभार भाग्यविधाता किसान संघाचे संचालक शिवानंद पाटील पुयड यांनी मानले.
यावेळी दिलासा संस्थेचे श्री बसवंते, किशोर देशमुख, नगरसेवक कैलास गोंडसे, अविनाश झमकडे, उपसरपंच शंकरराव व्यवहारे, तंटामुक्त समिती अध्यक्ष हिरामन व्यवहारे, किरण महाजन, बळीराम लोणवडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख, ग्रामपंचायत सदस्य नरसिंग आठवले, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलासराव देशमुख, श्रीनिवास म्हादवाड, रूपेश मुंडीक यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ. किरण देशमुख, सुरेश देशमुख, शिवानंद पाटील, शिवानंद व्यवहारे, किशन कदम, आनंद देशमुख, शरद देशमुख यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Related Photos