Breaking news

अनुसूचित जातीच्या महिलेसह दोन महिलांचा विनयभंग

नांदेड(खास प्रतिनिधी)डोंणगाव ता.मुदखेड आणि हिप्परगाव थडी ता.बिलोली या दोन ठिकाणी महिलांच्या विनयभंगाचे प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाले आहेत. यातील एका महिला अनुसूचित जमातीची आहे.

डोंणगाव ता.मुदखेड येथील एका 37 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 13 मार्चच्या सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास तिने आपल्या मुलाला सार्वजनिक रस्त्यावर का खेळतो म्हणून शिव्या दिल्या. तेंव्हा एका शेजारच्या माणसाने त्या महिलेला अश्लिल शिवीगाळ करुन वाईट उद्देशाने तिचे केस धरुन हातातील काठीने मारहाण केली मुदखेड पोलिसांनी त्या माणसाविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक देवणे करीत आहेत.

हिप्परगा थडी येथील एका 25 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार ती अहेमद साब यांच्या शेतात तंबाखू तोडण्याचे मजुरीचे काम करीत होते. दि.13 मार्च 2017 रोजी सायंकाळी 5.20 वाजेच्या दरम्यान एका माणसाने ती एकटी काम करताना पाहून वाईट हेतूने तिच्याशी झोंबाझोंबा केली सोबतच कोण्या इतरास सांगितले तर जिवे मारील अशी धमकी दिली.ही महिला अनुसूचित जातीची आहे हे माहित असून सुध्दा त्या माणसाने महिलेच्या विनयभंगाचा प्रकार केला. बिलोली पोलिसांनी त्या माणसाविरुध्द अनुसूचित जाती, जमाती अत्याचार कायदा आणि इतर भारतीय दंडविधानातील कलमासह गुन्हा दाखल केला असून पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे अधिक तपास करीत आहेत.

Related Photos