logo

BREAKING NEWS

महात्मा गांधी तंटामुक्त जिल्हा मूल्यमापन समितीत नवनाथ भद्रे

मुखेड, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या जिल्हा मुल्यापन समितीच्या सदस्यपदी मुखेडातील दै.गाववाला  व लोकपत्रचे पत्रकार नवनाथ भद्रे यांची निवड झाली आहे.

ज्या ग्रामपंचायतीनी तंटामुक्त गावचे निकर्ष पूर्ण करुन व ग्रामसभा घेवुन गाव तंटामुक्त झाल्याची घोषित केले अशा गांवाचे  मोहीम अंतर्गत केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक स्वतंत्र मूल्यमापन समिती जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या वतीने गटीत करण्यात येते या समितीत तहसीलदार,पोलिस निरीक्षक,गटविकास अधिकारी, सभापती, पंचायत समिती सरकारी वकील व एक पत्रकार प्रतिनिधी यांचा विशेष समावेश असतो. त्यानुसार मुखेड तालुक्यातील तंटामुक्त जिल्हा मुल्यमापन समितीवर पत्रकार नवनाथ भद्रे यांची निवड करण्यात आली आहे. 

नवनाथ भद्रे हे सन २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असुन त्यानी लोकपत्र, लोकनायक, गाववाला यासह वृतसंकलनाचे कार्य केले असुन सध्याते दै.लोकपत्र या वृतपत्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत असुन ते गेल्या पंधरा वर्षा पासून एन.जि.ओ. च्या सामाजिक क्षेत्रात स्टेट लेवलच्या नेटवर्कमध्ये ग्रामीण विकास परिषद कार्यकर्ता परिषदेतमध्ये समन्वयक म्हणून काम करत आहेत व नुकताच त्यांच्या संस्थेकडुन सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टकार्य केलेल्या कामाची दखल घेवुन नांदेड येथील नेहरू युवा केंद्राच्या वतीने त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट जिल्हायुवा मंडळ पुरस्कार व पंचवीस हजार रूपयाचे धनादेश व सन्मान चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या अरुन डोंगरे  यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला गेल्या अनेक वर्षा पासून संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरीभागात जानिव जागृती, अंधश्रधा निर्मूलन, बेटी पढाव-बेटी पढाव, जमिन हक्क अधिकार, राईट टु फुट, लॅड राईट, इत्यादी सामाजिक चळवळी मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांची दखल घेवुन मूल्यमापन समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे जिल्हाधिकारी अरुन डोंगरे, पोलिस अधिक्षक चंद्रशेखर मिना, आ.डाॅ.तुषार राठोड, आ. अमरनाथ राजुरकर, आ.विक्रम काळे, आ.सुभाष साबणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस माधव अण्णा साठे,  संपादक रुपेश पाढमुक, लोकसंकेत चे संपादक नामदेव यलकटवार रमेश पांडे,रमेश मस्के, मा.आ.हणमंतराव पा.बेटमोगरेकर दिलीपराव बेटमोगरेकर कैलास अस्वले, कीर्ती मुनेश्वर, संजय रावनगावकर, सुरेश गवळे, व्यंकट पा. दबडे, संजयसिंह देवकत्ते, पि.डी.दळवी आदी मान्यवरांनी त्यांच्या भावीकार्यास मान्यावरांनी शुभेच्छा दिल्या.

    Tags