logo

BREAKING NEWS

मुखेड तालुक्यांतील हीपरगा गावात गेस्ट्रोची लागण

१०५ हुन अधिक रुग्नांनी पकडल्या खाटा

मुखेड, पीण्‍यासाठी पाणी वापरत असलेल्‍या बोअरचे पाणी पील्‍याने गावातील 105 नागरीकांना गॅस्‍टोची लागन झाली. यातील 15 नागरीकांची परीस्‍थीती गंभीर आहे. त्‍यांच्‍यावर जळकोट येथील रुग्‍नालयात उपचार सुरु आहे. ही घटना दि.15 रोज सोमवार सकाळी ७.३० वाजताची असल्‍याची माहीती वैद्यकीय अधीकारी डॉ.रमेश गबाळे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दीली.

या घटनेचे सवीस्‍तर वृत असे की, तालुक्‍यातील हीपरगा गावामध्‍ये पाणी पुरवठा योजना बंद आहे. गावातील नागरीकांना पाण्‍यासाठी गावामध्‍ये दोन बोअर आहेत. त्‍यातील एका बोअर जवळ गावातील नालीचे पाणी झीरपत होते. ते पाणी त्‍या बोअरच्‍या पाण्‍यामध्‍ये गेले असतांनाही गावातील नागरीक ते पाणी पीण्‍यासाठी वापरत होते. दि. 15 रोज सोमवारी सेकाळी साडेसातच्‍या दरम्‍यान गावातील नागरीकांना उलटया व जुलाब सुरु झाले. ही घटना सरपंचांने अरोग्‍य अधीकारी डॉ़.रमेश गबाळे यांना कळवली. यावेळी त्‍यांनी डॉ. श्रीनीवास हसनाळे, डॉ. माया कापसे, डॉ. दीपाली गोरे या डॉक्‍टरांची पथक हीपरगा येथे पाठवून नागरीकांवर उपचास सुरु केले. यातील 15 गंभीर रुग्‍नावर जळकोट येथील रुग्‍नालयात उपचार सुरु आहे. सदरील बोअरचे पाणी तपासणीसाठी रासायणीक प्रयोग शाळेमध्‍ये पाठवण्‍यात आले असून रुग्‍नांची तबीयत सुधारत असल्‍याची माहीती डॉ.गबाळे यांनी दीली.

    Tags