जन्म देणाऱ्या मातीशी नेहमी इमान राखेन - मनोज गोंड

जांब बु.(सोमनाथ राऊत)नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जांब गणामध्ये भाजपा कडून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले मनोज गोंड यांचा सत्कार शालेय व्यवस्थापन समिती जांब च्या वतीने शाळेत त्यांचा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलताना म्हणाले याच प्राथमिक शाळेत माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेअसून या शाळेसाठी यापूर्वी ग्रामपंचायत माध्यमातून आणि वयक्तिक पातळीवरून सहकार्य केले असून या मातीत मी घडलो आणि घडत गेलो. सर्व मतदारांच्या आशीर्वादाने मला आणल्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पुंडे यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला या कार्यक्रमात बाळासाहेब पुंडे,गोविंद बनसोडे,उद्धव लटपटे,सत्कार मूर्ती मनोज गोंड यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य अण्णाराव शिंदे,सूर्यकांत मोरे,श्याम शिंदे,छटेवाड, शेख,कासार,धुळशेटे, गुट्टे,दिक्कटवर,गवंडगावे,कराड व सर्व शिक्षक उपस्तीत होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे राजू यांनी केले.

Related Photos