Breaking news

समीक्षा साहित्य संस्कारच्यावतीने मराठी गौरव दिन साजरा

नांदेड(प्रतिनिधी)नायगाव तालुक्यातील मुस्तापूर येथे समीक्षा साहित्य संस्कार फाऊंडेशन शाखा नायगाव च्यावतीने मराठी राजभाषा गौरव दिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्तापूरच्या सरपंच सौ. ललिता सुदाम गायकवाड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोंजे, लक्ष्मण चाकुरे, माधवराव मालीपाटील शिंदे, गणेश पाटील, ओंकार धुमाळे, बालाजी चाकुरे, नरेंद्र धोंगडे हे होते.

कार्यक्रमाची सुरूवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक समीक्षा साहित्य संस्कार फाऊंडेशनचे तालुका अध्यक्ष हनुमंत चंदनकर यांनी केले. उमाकांत जाधव, मारोती चंदनकर, प्रमोद जाधव, कु. माया जाधव, प्रतीक्षा नेमाळे, सुप्रिया जाधव, पूनम जाधव, साक्षी पांचाळ, सोनाक्षी जाधव, वैष्णवी सोनेरी, पूजा गायकवाड या चिमुकल्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी गावातील प्रतिष्ठीत नागरिक दत्ताहरी जाधव, बालाजी चाकुरे, दत्ताहरी लोणे, धोंडिबा गायकवाड, रघुनाथ पाटील, दिगांबर बोईनवाड, मालोजी लोणे, बालाजी जाधव, गणपत धुमाळे, माणिका गायकवाड, बालाजी गायकवाड, जळबा गायकवाड, नागेश नेमाळे यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी आभार कवी उमाकांत जाधव यांनी मानले.

Related Photos