नुतन जि.प. सदस्या पुनम पवार यांच्या हस्ते गँसचे वाटप

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)प्रधानमंत्री उज्ज्वल गँस योनेंतर्गत मांजरम येथील ४५ लाभार्थ्यांना भाजपाच्या नुतन जिल्हा परिषद सदस्या पूनम पवार यांच्या हस्ते गॅसचे वाटप करण्यात आले. सदरचा कार्यक्रम मांजरम येथील ग्राम पंचायत कार्यालयात ११ मार्च रोजी पार पडला .

या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी शिंदे हे होते. तर भाजपा युवा मोर्चाचे नायगांव तालुका अध्यक्ष राजेश पाटील शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ.पवार म्हणाल्या भाजपा सरकारच्या अनेक स्तुत्य उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे. गोरगरिबांना विशेषत: महीला वर्गाच्या आरोग्याची काळजी घेऊन धुरामुळे होणा-या आजारापासुन बचाव होण्याच्या दृष्टीने गॅस जोडणी अत्यंत गरजेची आहे. ४५ लाभार्थ्यांना गँसचे वाटप ही प्राथमिक बाब असून आता मांजरम विभागात महीलासाठी अनेक उपक्रम राबवून महीलाची शक्ती विधायक कामासाठी लावायची आहे असे असून. याप्रसंगी अनेक कार्तबगार महीलांचे उदाहरण देत माझ्या विजयात महीलांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगीतले. यावेळी राजेश शिंदे यांच्या वतीने पहील्यांदा सौ. पवार यांचा सत्कार करण्यात आला. गॅस जोडणी मिळवून देण्यासाठी सामाजिक भावनेतून मदत केल्या मुळे अरविंद दिगांबरराव शिंदे यांचा सत्कार सौ. पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्रीपत शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी सरपंच सरोजनी मंगनाळे, सुनिल शिंदे, अशोक पिंपळे, गोविंदराव शिंदे, व्यंकटराव केते, अशोक जांभळे, श्रीपतराव शिंदे, आनंद जाधव, बाबुराव पाचपिपळे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्यने उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुञ संचलन साहेबराव जाधव यांनी केले.

Related Photos