Breaking news

टाकळी गावात अज्ञात चोरटयांनी केली घरफोडी.. सोने चांदीचे दागीने लंपास

नायगाव बाजार(प्रतिनिधी)नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टाकळी ( त.मा .) येथे शुक्रवार च्या रात्री अज्ञात चोरटय़ांनी चार घरे फोडून रोख रक्कम सह सोन्याचे व चांदीचे दागिने मिळुन जवळपास एक लाखाच्या वर ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे .

टाकळी ( त.मा.) ता. नायगाव येथील महीला पार्वतबाई माधवराव हंगरगे ही मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते सदरील महिलेस मूलबाळ नसल्याने दररोज प्रमाणे शुक्रवारी रात्री जेवण करून घराला कुलूप लावून शेजारच्या घरी जाऊन झोपली होती. त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरटय़ांनी सदर महिलेच्या घराचे कुलूप तोडून घरातील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने व दहा तोळे चांदी व रोख विस हजार रुपये अशा एकूण 85 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. तर गावातील इतर तीन घरे ही चोरट्यांनी फोडले त्यातील एका घरातील आठ हजारांचे दागिने चोरट्याच्या हाती लागले तर दोन घरात मात्र चोरट्याच्या हाती काही लागले नाही. हाती काहीच लागले नसल्याने चोरट्यांनी या चारही घरातील वस्तुची नाश धुस करत घरातील घान्याचे पोते फोडून सर्वत फेकुन देत घरातील गाठोडे, लोखंडी पेठ्या आदी महत्वाची कागदपत्रे गावाच्या बाहेर नेवून फेकून दिले. अज्ञात चोरटय़ांनी एकाच रात्री चार घरे फोडल्याने नागरीकात मात्र भितीचे वातावरण पसरले आहे. पार्वतबाई हंगरगे ही महीला गेल्या कित्येक वर्षांपासून मोलमजुरी करून पदरमोड करून जमा केलेली रोख व दागिने अज्ञात चोरटय़ांनी नेल्याने ती मात्र आडचणीत आली आहे. सदर घटनेची माहिती शनिवारी नायगाव पोलीसांना कळताच पोलीस गावात भेट देवून चोरीची माहीती घेतले आहेत.

Related Photos