Breaking news

कुंटूर येथे कच-याची होळी करुन पर्यावरणपुरक होळी साजरी

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)होलीकोत्सवानिमित्त अंधश्रध्दा निर्मूलन समिती कुंटूर ता. नायगावच्या वतीने पर्यावरणपुरक होळीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी झाडूची प्रतिकात्मक पूजा केल्यानंतर मंदीराचा परिसर स्वच्छ करुन एकत्रीत करण्यात आलेल्या कच-याची होळी करण्यात आली. कुंटूर येथील तरुणांनी आगळ्या वेगळ्या पर्यावरणपुरक होळीचे आयोजन करुन गावात एक नवीन आदर्श निर्माण केल्याने या तरुणांचे कौतूक होत आहे.

होळी हा सण दुर्गूण, दुराचार व दुष्कृत्याची होळी करून सदगुण आणि सदाचाराचा प्रचार करणारा सण. या दिवशी परिसरातील. कचरा, घाण जमा करून नष्ट करणे अपेक्षीत असते. परंतु समाजात मात्र असे होतांना दिसत नाही. झाडे तोडून होळी साजरी करण्याची आजही ग्रामीण भागात प्रथा आहे. मात्र सणांना व उत्सवांना येणारे स्वरूप पर्यावरणाचा नाश करणारे होत आहे. निसर्गाचा समतोल बिघडविणारी शहाणी माणसं निसर्गाच्या दातृत्वाकडे दुर्लक्ष करतात. सामाजिक भान असलेल्या व्यक्ती पर्यावरणपूरक होळीला विरोध करतात. कारण विचारले तर धर्म भ्रष्ट होतो. अशी स्पष्टीकरणे देतात पण कुंटूरच्या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सदस्यांनी व साने गुरुजी संस्कारमाला वाचनालयाच्या संयूक्त प्रयत्नानी पर्यावरणपुरक होळीसाठी तरुणांनी पुढाकार घेवून तो प्रत्यक्षात आणला आहे.

साने गुरुजी संस्कारमाला वाचनालयाचे प्रा. बाळू दुगडूमवार, संजय आडकिने, मारोतराव कदम, संजय ठिकाणे, युसूफ शेख, गजानन आडकिने, गजानन राचेवाड, सचिन आडकिने, बालाजी आडकिने, प्रविण दुगडूमवार, राम आडकिने, प्रल्हाद आडकिने, नितीन महादळे, अनिल कदम,राजेश आडकिने, सुदर्शन जाधव यांनी तर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते मोहनराव अडकिने, मोहनराव होळकर, दिगांबर सुगावे, दिगांबर पुठ्ठेवाडव अच्युत गिरी अदिंनी मंदीराचा परिसर झाडून स्वच्छ केला व जमलेल्या कच-याची होळी सेवा सहकारी सोसायटीचे सदस्य जरासंध पाटील यांच्या हस्ते पेटवण्यात आली. ग्रामीण भागात आजही होळीबद्दल मोठ्या प्रमाणात आंधश्रद्धा असतांना कुंटूर येथील तरुणांनी मोठ्या धाडसांने पर्यावरणपुरक होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आणि झाडूची प्रतिकात्मक पुजा करुन स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्व असल्याचेही सिध्द केले आहे. त्यांच्या या पर्मवरणपुरक होळीचे गावातील अनेकांनी कौतूक केले आहे.

Related Photos