Breaking news

नायगावात काँग्रेस - राष्ट्रवादीची दिलजमाई सभापतीपदी सौ. पवार तर उपसभापतीपदी हंबर्डे

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)साडेसात वर्षानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीत दिलजमाई झाल्यामुळे नायगाव पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या वंदना मनोहर पवार यांची तर उपसभापती राष्ट्रवादीच्या सुलोचना प्रल्हाद हंबर्डे यांची निवड झाली आहे. सभापती व उपसभापतीपदी महीलाच विराजमान झाल्याने नायगाव पंचायत समितीत महीला राज आले आहे.

नायगाव पंचायत समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी १४ मार्च रोजी मंगळवारी नुतन पंचायत समिती सदस्य वंदना पवार, सुलोचना प्रल्हाद हंबर्डे, पाटील संजय माधवराव, मद्देवाड अंजना बालाजी, जुन्ने पार्वती गजानन, कांबळे धोंड्याबाई, धानोरकर प्रतिभा ओमनाथ व प्रभावती विठ्ठल कत्ते अदिंच्या उपस्थितीत आणि पिठासन अधिकारी तथा तहसिलदिर काशीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभापती पदासाठी काँग्रेसच्या सौ. वंदना मनोहर पवार व भाजपाच्या धोंड्याबाई माधव कांबळे तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या सुलोचना प्रल्हाद हंबर्डे व भाजपाच्या प्रतिभा ओमनाथ पाटील यांनी नामांकन दाखल केले होते. सभापती व उपसभापती पदासाठी दोन दोन अर्ज आल्याने पिठासन अधिका-यांनी हात उंचावून मतदान घेतले यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाच मते तर भाजपाच्या उमेदवारास तीन मते पडली. यामुळे पिठासन अधिकारी काशिनाथ पाटील यांनी सभापती पदी सौ. वंदना पवार तर उपसभापतीपदी सुलोचना हंबर्डे यांची निवड झाल्याची घोषणा केली.

निवडीची घोषणा झाल्यानंतर नवनिर्वाचित पदाधिका-यांचा आ. वसंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी माधवराव पाटील शेळगावकर, रावसाहेब पाटील मोरे, माधवराव बेळगे, बाळासाहेब धर्माधिकारी, मोहन पाटील धुप्पेकर, श्रीनिनिवास चव्हाण, संभाजी भिलवंडे, भास्कर भिलवंडे, नुतन जि.प. सदस्या विजयश्री कमठेवाड, मनोज पाटील मोरे,पंढरीनाथ कमठेवाड, बालाजी मद्देवाड, श्रीहरी देशमुख, बाबासाहेब हंबर्डे, प्राचार्य मनोहर पवार, द्ता येवते, किरण कदम व गजानन जुन्ने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे आठ सदस्य असलेल्या पंचायत समितीत सात महीला सदस्य आसून एकच पुरुष सदस्य आहे. सदरच्या निवडीनंतर फटाक्याची अतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.

Related Photos