Breaking news

बारुळ गावात झाली सोन्या, चांदीचे दागिणेसह दोन लाखांची चोरी

नांदेड(खास प्रतिनिधी)मौजे बारुळ येथे सोयाबीन विकून घरात ठेवलेले 90 हजार रुपये आणि इतर सोन्या, चांदीचे दागिणे असा दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मागील आठवड्यात चोरांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी चोऱ्या करुन पोलिसांसमक्ष मोठे आव्हान उभे केले आहे.

मारोती गोविंद शहापूरे रा.बारुळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.13 मार्चच्या सकाळी 10.30 वाजेच्या दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून त्यानंतर आतील एका रुमचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाट फोडले. या कपाटातील सोयाबीन विकून आलेल्या रक्कमेपैकी शिल्लक राहिलेली 90 हजार रुपये रोख रक्कम आणि सोन्याच्या पाटल्या असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. उस्माननगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सावळे करीत आहेत.

Related Photos