दुसर्याचा सन्मान करण्यासाठी अंगी दातृत्व असावं लागतं - भिलवंडे

नरसीफाटा(सुभाष पेरकेवार)स्वतःचा सन्मान इतरांकडून करून घेण्यासाठी स्वतः च्या अंगी कतृत्व असावं लागतं; परंतु इतरांच्या कतृत्वाचा, कलागुणांचा शोध घेऊन गुणीजनांचा सन्मान करण्यासाठी मात्र अंगी उपजतच दातृत्व असावं लागतं ते दातृत्व सुहास व सचिन पाटील या टाकळीकर बंधूत मला दिसून आले म्हणूनच ग्रामीण भागात विविध क्षेत्रातील गुणी जनांचा शोध घेऊन त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला. आपल्या मातीतल्या माणसांचा सन्मान करून आपला सुसंस्कृतपणा सिद्ध केला असे भावोद्गार साहित्य संस्कृती मंडळाचे माजी सदस्य भगवानराव पाटील भिलवंडे यांनी व्यक्त केले.

धुप्पा तालुका नायगाव येथील संकल्प बहुउद्देशिय संस्थे अंतर्गत किडस् कॅम्पस इंग्लिश स्कूल मध्ये शालेय सांस्कृतिक महोत्सव व संकल्प पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून सहाय्यक पोलीस निरिक्षक दिलीप गाढे हे होते तर व्यासपीठावर स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर, जिल्हा परिषद सदस्या डाॅ मीनलताई खतगावकर , माणिकराव लोहगावे, संजय पाटील शेळगावकर ,बिलोली पंचायत समिती च्या नवनियुक्त सभापती भाग्यश्री अनपलवाड, पंचायत समिती सदस्या सुंदरबाई पाटील, सचिन पाटील टाकळीकर , सुहास पाटील टाकळीकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी यावेळी मान्यवरांच्या हस्ते रामतीर्थ व नरसी जिल्हा परिषद गण व गटात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर विविध क्षेत्रात ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य करणार्या मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. त्यात रामतीर्थ गटातून आदर्श शिक्षक म्हणून - शेख समदानी महेबुब , ग्रामसेवक -विश्वनाथ वैजनाथ केंद्रे , तलाठी- बी.एन. बिराजदार , पत्रकार - प्रदीप धोंडीबा पाटील , यांचा तर नरसी गटातून शिक्षक- सौ. आर. एम. वेंकटपूर्वारमँडम ,ग्रामसेवक - प्रल्हाद उत्तमराव गोरे , तलाठी- विजय पाटील जाधव , पत्रकार - सुभाष पेरकेवार , आदर्श पोलीस पुरस्कार. गोविंद शिंदे आदींना 'संकल्प पुरस्कार देऊन सन्माननीत करण्यात आले.

त्या नंतर शेळगावकर व श्री गाढे यांची भाषणे झाली. या प्रसंगी बिलोली चे शिवसेना तालुका प्रमुख बाबाराव रोकडे , माधव कंधारे, अवकाश पाटील, गंगाधर आनपलवार, बालाजी जाधव, विश्वनाथ अब्दागिरे, विवेक पाटील, महेश पाटील, गंगाधर दमकोंडवार, राजाराम पागेकर सर , हांनमंत गजले,अंबादास अब्दागीरे,शेख बाबुसाब,बळवंत पा. बोरगावकर, यादव पाटील भेलोन्डे, मारोती गजलवाड,संतोष देगलुरे, बळीराम बावने, आनंद बावने, शंकर अमोघे , सचिन पाटील खतगावकर, मष्णाजी सगरोळे, सतीश पाटील चिटमोगरेकर, हांनमंत पेन्टे, शिवशंकर पाटील, श्याम मजगे, संभाजी पाटील,संतोष लष्करे,उत्तम गुंडावार, माधव घाटोळे, शेख खाजा, नरसिंग भेलोडे,बाबु भेलोंडे, भास्कर बेटमोगरेकर, राजू रावलकर, दिलीप चोन्डे, सुधाकर चोन्डे, संतोष चिलकावार, मुरलीधर चोन्डे, शंकर मोटरगे मारोती कदम, विठल पाटील, शिवराज वाढवणे, न्यानेश्वर बावने आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी शाळेचे मुख्याध्यापक नारायण कोसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक संतोष चोन्डे, संगीता किनाळकर, शामा इंदुरे, शिल्पा अल्लापूरे, वैशाली पांचाळ , नागनाथ सम्बलवाड , हणमंत संबलवाड आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकात अमलापुरे व नागनाथ वाढवणे यांनी केले. आभार प्रदर्शन सुहास पाटील टाकळीकर यांनी केले. दरम्यान चार तास चिमुकल्यांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही रंगतदार संपन्न झाला.

Related Photos