शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सेनेचा उद्या कुष्णूर येथे रास्तारोको

नायगांव बाजार (प्रतिनीधी) दुष्काळ व सततच्या नापीकीमुळे शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आसताना शासनाचे शेतक-याप्रती उदासिन धोरण आहे. त्यामुळे संपुर्ण कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी आज १७ मार्च रोजी कुष्णूर महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलण करण्यात येणार आसून. परीसरातील शिवसैनिक व शेतकर्यानी रास्ता रोकोत मोठया प्रमाणत सहभागी व्हावे आसे आवाहण उपतालुका प्रमुख प्रल्हाद पिंपळे यानी केले आहे.

सततचा दुषकाळ व नापीकीमुळे शेक-यांच्या आत्महत्या थांबायला तयार नाहीत. आत्महत्यामुळे हजारो शेतक-यांची कुटूंबे देशोधडीला लागत आहेत तरी शासन या गंभीर बाबीची दखल घेत नसल्याने. शेतकयांच्या पाठीमागे शिवसेना खंबीर ऊभी राहणार आसून. जो पर्यत शेतक-यांना संपुर्ण कर्जमाफी मिळनार नाही तो पर्यत आंदोलन चालुच राहील आशी ठाम भुमिका घेत शिवसेना महाराष्ट्रभर कर्जमाफी आंदोलन करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायगाव तालुक्यातील कुष्णूर येथे नांदेड - हैद्राबाद महामार्गावर आज १७ मार्च रोजी ११ वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हा समन्वयक धोंडु पाटील, सहसंपर्क प्रमुख प्रकाश कोडगे, संजय गांधी निराधार तालुका अध्यक्ष गंगाधर बडुरे, तालुका प्रमुख रविंद्र भिलवंडे, उपतालुका प्रमुख गजानन गंजेवार, शहरप्रमुख माधव कल्याण, यांच्या नेतृत्वखाली रास्ता रोको करण्यात येणार आहे. तरी परीसरातील शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणात उपस्थित रहावे असे आवाहन उपतालुका प्रमुख प्रल्हाद पिंपळे व माधव जाधव यानी केले आहे.

Related Photos