Breaking news

नायगावमध्ये उद्या सार्वजनिक शिवजयंती

नायगाव बाजार(प्रभाकर लखपत्रेवार)दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आज १७ मार्च रोजी शिवजयंती साजरी करण्यात येणार असून. दुपारी ३ वाजता जेजूरी पुणे येथील व्याख्याते शिवश्री नितलेश जगताप यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहीती आयोजक माणिक चव्हाण यांनी दिली आहे.

दरवर्षी नायगाव शहरातील शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राजेंच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केल्या जाते. या शिवजयंती निमित्त नुसतीच मिरवणूक नाही तर प्रत्येक वर्षी नवीन व्याख्य्यात्यांना बोलावून बौध्दीक मेजवानीची संधी तरुणांना उपलब्ध करुन दिल्या जाते. आज शुक्रवारी सकाळी हनुमान मंदिरापासून राजेंच्या जयंतीची मिरवणूक निघणार असून जनता हायस्कूलच्या मैदानावर समारोप होणार आहे. या. प्रसंगी आ. वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती तर माजी जि.प.सदस्य माधवराव बेळगे, हनमंतराव चव्हाण, खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास चव्हाण, नगराध्यक्ष सौ. सुरेखा पंढरीनाथ भालेराव, उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, शिवराज पा. होटाळकर, जि प चे शिक्षण सभापती संजय बेळगे, प्रा. रविंद्र चव्हाण, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रदिप पाटील कल्याण अदिंची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मिरवणूकीची सांगता झाल्यानंतर दुपारी ३ वाजता जनता हायस्कूलच्या मैदानावर जेजूरी पुणे येथील व्यख्याते शिवश्री निलेश जगताप यांचे 'ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवराय' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असून या व्याख्यानाचा लाभ तरुणांनी घ्यावा असे आवाहण संयोजन समितीच्या वतीने माणिक चव्हाण, नगरसेवक पांडूरंग चव्हाण, हनमंत शिंदे, सुमित कल्याण, बालाजी चव्हाण, गणेश कल्याण, नगरसेवक शरद भालेराव, प्रविण भालेराव, दिपक तमलुरे, उमेश चव्हाण, विठ्ल बेळगे, बंटी शिंदे, रोहीत चव्हाण व शिवराज चव्हाण यांनी केले आहे.

Related Photos