Breaking news

कर्ज माफीसाठी शिवसेनेचा कुष्णूर येथे रास्तारोको, नांदेड-हैद्राबाद महामार्ग ठप्प

नायगाव बाजार(प्रतिनीधी)शेतकऱ्याना कर्जमाफी देवून सात बारा कोरा करण्यात यावा या मागणी साठी शिवसेनेच्या वतीने अंदोलनाचा ऐल्गार पुकारण्यात आला आसून. नांदेड हैद्राबाद महामार्गावर कूष्णूर येथे रस्ता रोको अंदोलन करण्यात आल्याने पुर्ण वहातूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे शिवसेनेच्या रस्तारोको अंदोलनात मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाल्याने अंदोलनास मोठे स्वरूप आले होते.

या अंदोलनात सेनेचे समन्वयक धोडूं पाटील, जिल्हाप्रमुख भुजगं पाटील, तालुका प्रमुख रविद्रं भिलवंडे, उप तालुका प्रमुख गजानन गंजेवार संयोजक उपतालुका प्रमुख प्रल्हाद पीपंळे, राजेश लंगडापुरे, सूधाकर जाधव, ओमप्रकाश धुप्पेकर, साहेबराव हेडंगे, प्रभाकर मेघळ, प्रकाश जाधव, सुनिल रामदासी, प्रकाश बोमनाळे, अनिल बोधने सह मान्यवर सहभागी झाले होते.

अंदोलनकर्त्या समोर बोलताना शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाल्या शिवाय आंदोलनातून मागार घेणार नाही. आसा ईशारा शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेद्रं फडवणीस यानां दिला आसल्याचे धोडूं पाटील यांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले. या वेळी वरील मान्यवरासह आनेक शेतकऱ्याचीं घनघनाती भाषणे झाली. सेनेच्या या अंदोलनामुळे महामार्गावरची वाहतूक दिडतास खोळबंली होती. रस्तारोको पहाता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.या अंदोलनात बाळासाहेब सर्जे, लक्ष्मण जाधव,पांडूरंग जा़धव, मधुकर जाधव, रावसाहेब जाधव, गगांराम हंगरगे, शिवाजी जाधव, पींटू जाधव, रावसाहेब कागडे याच्यां सह शेतकरी नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Photos