गटई कामगारांचे स्टॉल वाटपासाठी समाज कल्याण विभागाचे दुर्लक्ष

नायगाव बाजार(प्रतिनीधी)परीसरातील गटई कामगारांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार तर्फे मागील सहा महिन्या पुर्वी नायगांव तालुका येथे येवून पडलेले पत्र्याचे स्टॉल समाजकल्याण निवासी शाळेच्या आवारात धुळ खात पडले आहेत. मात्र संबंधीत लाभार्थ्यांना सदरील स्टॉल वाटप करण्याच्या कामाला जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे साफ दुर्लक्ष करीत असल्याच्या प्रतिक्रीया लाभार्थ्यां मधून ऐकावयास मिळत आहेत.

रस्त्याचे बाजूस फुटपाथवर बसून गटई काम करणाऱ्या चर्मकार नागरीकांचा उन, वारा, पाऊस या पासून बचाव झाला पाहिजे या करीता शासन प्रत्यकांना एक पत्र्याचे स्टॉल व पाचशे रुपयाचा चेक देण्याची योजना आहे. त्या नूसार नायगांव तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी सहा महिने झाले. जवळपास शंभर स्टॉल येवून पण अद्यापही संबंधीत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे समाज कल्याण अधिका-याची या वाटप कामासाठी एवढी उदासीनता का आसावी असा संतप्त सवाल केला जात आहे.

जिल्हा समाजकल्याण अधिका-यांनी नायगांव तालुका येथे येवून पडलेले पत्र्याचे स्टॉल व धनादेश संबंधीत लाभार्थ्यांना तात्काळ वाटप करणे गरजेचे असतांना पावसाळा गेला हिवाळा संपला आणि ऊन्हाळा आला तरीही स्टालचे वाटप नाही आजही चर्मकार बांधव उन्हातच रोडच्या बाजूला बसून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. वातानुकूलीत खोलीत बसून गोरगरिबांच्या विकासावर गप्पा मारणा-या अधिका-यांना सहा महीण्यापासून स्टल धुळखात पडले तरी ते वाटप करावे वाटत नाही ही अतिशय दूदैवाची बाब असल्याची संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहे.

Related Photos