Breaking news

अटो ट्रक्टरवर आदळला सहा जखमी ; दोन गंभीर

नायगाव बाजार(प्रतिनिधी)नरसीहून नायगावकडे येणारा अटो नायगावपासून दोन कि मी अंतरावर रोडवर नादूरुस्त असलेल्या ट्रक्टरवर धडकल्याने अटो चालकासह सहाजण जखमी झाले असून. जखमी पैकी दोघे गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ नांदेडला पाठवण्यात आले आहे. सदरची घटना सोमवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान घडली.

दत्तनगर ता. नायगाव येथील अटो चालक शेख मैनोद्दिन हा आपल्य सहा वर्षाच्या मुलीसह अन्य चार प्रवाशी घेवून ( एम एच २६ ए सी २४४३ ) नरसीकडून नायगावकडे काल सोमवारी रात्री सात वाजताच्या दरम्यान येत होता. दरम्यान नरसीपासून दोन कि मी अंतरावर खैरगाव नजीकच्या पुलावर दगडाने भरलेल्या ट्रक्टरचे ( क्र. एम एच २६ व्ही ८५४१ ) टायर पंक्चर झाल्याने पुलाच्या बाजूलाच उभा होता. या उभ्या असलेल्या ट्रक्टरवर अटो धडकल्याने मेहेत्रे गंगाधर बिलोली, मिसबाह शेख मनोद्दिन(६) पंचुबाई तंगलवाड कोकलेगाव (४५), विकास बालाजी घ़टेवाड खैरगाव १७, शेख मैनोद्दिन दत्तनगर (चालक), दिलीप कांचने धर्माबाद अदि सहा जन जखमी झाले. या जखमी पैकी चालक शेख मैनोदिन व मिसबाह ही चिमुकली गंभीर जखमी झाल्याने या दोघांना पुढील उपचारार्थ नांदेडला पाठवण्यात आले आहे. दरम्यान जखमी रुग्नांना नागरिकांनी नायगावच्या ग्रामीण रुग्नालयात तातडीने आणले पण येथे एकच वैद्यकिय अधिकारी व एक परिचारीकाच हजर असल्याने उपचारात दिरंगाई होत होती. तेवढ्यात खाजगी डाँ. विश्वास चव्हाण हे रुग्णालयात येवून जखमीवर उपचार केले आहेत. महामार्गावरील अपघाताचा मोठा ताण येथील रुग्नालयावर असतांना वैद्यकिय अधिका-याची वणवा असते.

Related Photos