logo

नविन नांदेड, सिडको परिसरातील संभाजी चौक भागात कृष्णनगर येथे मोकळ्या जागेत तिरट नावाचा जुगार खेळणा-या चार जनांना ग्रामीण पोलीस स्थानकाच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करुन दोन दुचाकीसह 01 लाख 25 हजाराचा मुदेमाल जप्त केला. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.09 जुलै रोजी कृष्णनगर भागात मोकळ्या जागेत तिरट नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महेश वसंतराव शिंदे रा.नायगाव, शेख हुसेन शेख करीमोद्दीन रा.कहाळा(बू.), विजय ऊर्फ विजु गणपतराव म्हैसेकर (गुत्तेदार) व मुस्ताक शेरखान रा.श्रीनगर या चार जनांना अटक केली. यावेळी दोन दुचाकी, मोबाईल व नगदी असा ऐकूण 01 लाख 25 हजाराचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. सदरील कार्यवाही ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गजानन मोरे यांनी व त्यांचे सहकारी पो.कॉ.एकनाथ मोकले, पद्मसिंह कांबळे, नामदेव ढगे, बालाजी पांचाळ, रेवण्णा कोळणुरे, राजु कौशल्ये व आवाड यांनी केले असून या प्रकरणी पो.कॉ.बालाजी पांचाळ यांच्या फिर्यादीवरुन कलम 12 अ महाराष्ट्र जुगार कायदानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करुन सुटका करण्यात आली. या कार्यवाहीमुळे मात्र प्रचंड खळबळ उडाली.

    Tags