logo

नांदेड, आपल्या सहा महिन्याच्या निरागस मुलीचा गळा आवळून खून करणाऱ्या बापाला कंधारचे जिल्हा न्यायाधीश राजेंद्र काकाणी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 

मरशिवनी ता.कंधार येथे दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजी अन्नपूर्णा मारोती होनराव या विवाहित महिलेने आपली सहा महिन्यांची मुलगी शिवकन्या हिला आपला पती मारोती होनराव याच्या जवळ सोडून जळतानाची लाकडे आणण्यासाठी रानात गेली. तेव्हा घरात इतर कोणीच नव्हते. अन्नपूर्णा परत आली तेव्हा लहान निरागस बालिका तडफडत होती. तिचा गळा कपडयाने आवळलेला होता.तिचा नवरा मारोती त्या जागी हजर नव्हता.या बाबत कंधार पोलिसांना माहिती देण्यात आलीलगेच त्या बालिकेला उपचारासाठी नांदेडच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले.उपचारा दरम्यान बालिका शिवकन्या दिनांक २२ नोव्हेंबर २०१६ रोजी मरण पावली. अन्नपूर्णा होनरावने आपल्या पती विरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार कंधार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यावेळी मारोतीचे आपण मुलीच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा खर्च कसा करावा या चिंतेने तिचा गळा आवळ्याचे सांगितले होते.

कंधार पोलिसांनी मारोती होनराव विरुद्ध खुनाचा  खटला कंधार न्यायालयात दाखल केला.या खटल्यात सरकार पक्षाने आठ साक्षीदार तपासले. या तपासणीत मयत बालिका शिवकन्याची आई अन्नपूर्णा फितूर झाली. तरीही उपलब्ध वैद्यकीय पुरावा आणि प्रकरणाच्या तपासिक अंमलदार पोलीस उप निरीक्षक कल्पना चव्हाण यांच्यावर विश्वास ठेवून न्या.काकाणी यांनी आपल्या सहा महिन्यांच्या निरागस बालिकेचा गळा आवळून खून करणाऱ्या बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू ऍड.महेश कागणे यांनी मांडली आणि त्यांना पोलीस कर्मचारी क्षीरसागर यांनी मदत केली.

    Tags