logo

नांदेड, नांदेड वाघाळा महानगरपालिकेला शासनाकडून प्रत्येक महिन्याला दीड कोटींच्या जवळपास अनुदान तरी येत आहे. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटात सापडली असून, या संदर्भात महापालिकेने शासन स्तरावर नवीन प्रस्ताव सादर करून पाठपुरावा करावा अशा सुचना आयुक्त गणेश देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दिले आहे.

राज्य शासनाने राज्यातील स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद केले. त्यानंतर महापालिकेचे मुख्य आर्थिक असलेल्या एलबीटीचे उत्पन्न बंद झाल्याने महापालिका आर्थिक तोट्यात आल्या होत्या. शासन स्तरावर या संदर्भात विचार विनीमय होऊन महापालिकांना अनुदान देण्याचे ठरले. राज्य शासनाने राज्यातील 20 च्या जवळपास महापालिकांना अनुदान जाहीर केले आहे. नांदेड महापालिकेचेही एलबीटीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होते. एलबीटी बंद झाल्याने महापालिका आर्थिक फटका बसला आहे. राज्य शासनाने नुकतेच राज्यातील महापालिकांना अनुदान जाहीर केले आहे. यामध्ये नांदेड महापालिकेला अत्यंत कमी अनुदान आले असून दरमहा 1.50 कोटींचा फटका बसत असल्याची माहिती उजेडात आली आहे. दरम्यान या संदर्भात आयुक्तांनी नुकतीच बैठक घेऊन आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. शासनाकडून कमी अनुदान येत असल्याने त्या संदर्भात संबंधीत विभागाने नवीन प्रस्ताव तयार करावा आणि शासन स्तरावर उपायुक्तांनी पाठपुरावा करावा अशा सुचना दिल्या आहेत.

    Tags