logo

नवीन नांदेड, कोपर्डी प्रकरण पुरोगामी महाराष्ट्राला लागलेला डाग आहे. हे या घटनेने दाखवून दिले. म्हणून अशा बलात्कारी नराधमांना तात्काळ फाशीच दिली पाहिजे. अशी मागणी करत या घटनेचा निषेध म्हणून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड च्या वतीने नांदेड येथे हडको व सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॅण्डल मार्च व श्रद्धांजली सभेत करण्यात आली.

आज कोपार्डी घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे तरी अद्याप आरोपींना कोणतीही शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाजाने संपूर्ण जगाने आदर्श घ्यावा असे क्रांती मूक मोर्चे काढले तरीसुद्धा अजूनही श्रद्धाला न्याय मिळाला नाही आणि आता भय्यू महाराज यांच्या विकृत मानसीकतेतून त्या पीडितेचे स्मारक बांधण्याचा विचार समोर येत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. समाजातील व्यक्तींनी, युवा पिढीने आपापसातील मतभेद दूर करून राजकीय पक्ष, संघटना बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी, आपल्या बहिनीच्या न्यायासाठी एकत्र येऊन कार्य केले पाहिजे श्रद्धा च्या मारेकर्यांना फाशी हिच खरी श्रद्धांजली असे प्रतिपादन जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा सरस्वती धोपटे यांनी केले. कोपर्डीतील हत्याकांड अमानवी आहे. परंतु आता कथीत संत भैय्यु महाराज कोपर्डीत पिडीतेचे स्मारक उभे करत आहे. परंतु स्मारके हे शौर्याचे व पराक्रमाची आठवण करून देणारी असतात. कोपर्डीत जे घडलं ते पाहून प्रत्येक माणसाची मान शरमेने खाली गेली आहे. म्हणून अशा प्रसंगाचे स्मारक उभारून माणूसकीला काळीमा फासण्याचे काम भैय्यु महाराज यांनी करू नये. नाहीतर त्याचे परिणाम भोगावे लागतील असे प्रतिपादन शाहीर गौतम भुकमारीकर यांनी केले.
 
मा.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला होता की, कोपर्डी प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून आरोपींना कठोर शासन करू, परंतु वर्ष झाले, या विरोधात लाखोचे मोर्चे महाराष्ट्रभर निघाले तरी सरकारवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. हे निषेधार्ह आहे. जिथे शासन कमी पडेल तिथे संभाजी ब्रिगेड पुढे असेल. कोपर्डीत स्मारक बांधून कुणासाठी आदर्श निर्माण करायचा आहे...? हे तपासले पाहिजे. याला चळवळीतील कार्यकर्ता व जागृत व्यक्ती म्हणून तिव्र विरोध आहे. असे मत संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संकेत पाटील यांनी सिडको येथील शिवराय पुतळा येथे आपले विचार मांडले. मराठा बहुजन समाजाच्या वतीने शासनाच्या दिरंगायीचा व भय्यू महाराजाच्या वक्तव्याचा निषेध करून श्रद्धा सुद्रीकला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश प्रवक्त्या सरस्वती धोपटे, मनकर्णा ताटे,रत्नमाला जाधव, ज्योती पाटील, वंदना मस्के, मंगला हिवराळे, शकुंतला पांडे, उज्वला चव्हाण, रुक्मिणी सूर्यवंशी, प्रेमला सूर्यवंशी, सरोजना तोरणे, गिरजाबाई कदम पत्रकार संघटनेचे रमेश ठाकुर, निळकंठ वरळे, शाम जाधव, संभाजी सोनकांबळे, अनिल धमने, युवाशक्ती मित्रमंडळाचे संजय घोगरे, काँग्रेस चे साईनाथ जाधव, मराठा सेवा संघाचे सोपान पांडे, त्र्यंबक कदम, सुभाष सूर्यवंशी, भगवान ताटे, ना ही उमाटे, प्रमोद टेकाळे, उत्तम जाधव, विजय लोखंडे, जयवंत काळे, गोविंद मजरे, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष संकेत पाटील, सिडको शहराध्यक्ष गजानन शिंदे, कामगार आघाडीचे शशिकांत गाढे, दिपक भरकड, साईनाथ टर्के, अॉटो युनियचे जिल्हाध्यक्ष भुजंग जाधव, स्कूल बस युनियनचे गजानन पवार, रोहिदास कवाळे, तानाजी पाटील, अश्विन लोखंडे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    Tags